...म्हणून सनी लिओनी शिकतेय खास यूपीची भाषा

सनी लिओनी शिकतेय चित्रपटासाठी खास भाषा 

Updated: Jun 14, 2019, 07:13 PM IST
...म्हणून सनी लिओनी शिकतेय खास यूपीची भाषा title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर काही ना काही कारणाने चर्चेत असते. कधी तिच्या मुलांमुळे, कधी जेसीबीमुळे तर कधी तिच्या फनी व्हिडिओमुळे ती नेहमीच चर्चेचा विषय ठरत असते. मात्र आता सनी लिओनी एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आली आहे. एकेकाळी हिंदीदेखील अडखळत बोलणारी सनी लिओनी आता चक्क उत्तर प्रदेशची भाषा बोलण्याच्या तयारीत आहे. सनी लिओनी तिच्या आगामी हॉरर कॉमेडी 'कोकोकोला' चित्रपटासाठी उत्तर प्रदेशची बोली भाषा शिकत आहे.

'कोकोकोला' चित्रपटाचे निर्माते महेंद्र धारीवाला पुढच्या महिन्याच्या शेवटी चित्रपटाचं शूटिंग सुरु करणार आहेत. चित्रपटाची कथा उत्तर प्रदेशवर आधारित आहे. तसंच चित्रपटात सनी उत्तर प्रदेशमधील मुलीची भूमिका साकारणार आहे. त्यासाठीच सनी उत्तरप्रदेशची स्थानिक भाषा शिकत आहे.

'ज्यावेळी एखादी गोष्ट माझ्या कामाशी निगडित असते त्यावेळी मी नवीन गोष्टी शिकण्यासाठी अतिशय उत्सुक असते. त्यामुळे ती गोष्ट नवीन भाषा शिकण्याची का असेना. नवीन गोष्टी शिकल्यामुळे मला एक कलाकार म्हणून विकसित होण्यासाठी मदत होते. काम करताना नवीन गोष्टी शिकण्याची एक वेगळीच मज्जाही असते. मी चित्रपटासाठी एक नवीन भाषा तर शिकतेच आहे, शिवाय त्यासाठी मी खूप मेहनतही घेत असल्याचं' सनीने माध्यमांशी बोलताना सांगितलं.

जयपुर में छुट्टियां मना रही हैं एक्ट्रेस सनी लियोनी, समर लुक हुआ Viral

सनीने २०११ मध्ये 'बिग बॉस सीजन ५' मधून भारतात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती. 'कोकोकोला' या हॉरर कॉमेडी चित्रपटाशिवाय सनी दक्षिण भारतीय 'रंगीला' आणि 'वीरामादेवी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.