प्रदर्शनापूर्वीच सनी लियोनीचा बायोपिक वादात अडकला

 बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या तिच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. 

Updated: Jul 13, 2018, 12:30 PM IST
प्रदर्शनापूर्वीच सनी लियोनीचा बायोपिक वादात अडकला title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी सध्या तिच्या बायोपिकमुळे चर्चेत आहे. सनीच्या बायोपीकचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. आता सनीने या वेब फिल्मच्या प्रमोशनलाही सुरुवात केली आहे. ‘करनजीत कौर- द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लियोन’ असे या फिल्मचे नाव असून प्रदर्शनापूर्वीच हा सिनेमा वादात अडकला आहे.

यामुळे निर्माण झालाय वाद

सनी आपल्या बायोपिकमध्ये स्वतःचा अभिनय करत आहे. पण एसजीपीसी प्रवक्ता दिलजीत सिंग बेदी यांनी सनीच्या बायोपिकवर टीका केली आहे. सिनेमाचे नाव करनजीत कौर आहे. यामुळे शीखांच्या भावनांशी खेळ केल्याचे त्यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, सनीने आपला धर्म बदलला आहे आणि आता तिला कौर हा शब्द वापरण्याचा कोणताही हक्क नाही. पण सिनेमाचे निर्माते आणि सनी लियोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

 १६ जुलैला होणार प्रसारीत

सनीचा बायोपिक ही वेब फिल्म आहे. ही फिल्म १६ जुलैला वेब प्लेटफॉर्म ZEE5 प्रसारित होईल. या सिनेमाचे दिग्दर्शन आदित्य दत्त यांनी केले आहे. स्वतःच्याच बायोपिकमध्ये स्वतः अभिनय करणारी सनी पहिलीच अभिनेत्री आहे. पाहा : सिनेमाचा ट्रेलर

या सिनेमामुळेही सनी चर्चेत

वेब सिरीजमध्ये सनीच्या लहानपणाची भूमिका १४ वर्षीय रसा सौजनी करत आहे. याशिवाय सनी लियोनी तेलगु सिनेमा वीरमहादेवीमुळेही चर्चेत आहे. यात सनी एका योद्धाची भूमिका साकारत आहे. लवकरच याही सिनेमाचे शूटिंग पूर्ण होईल.