मुंबई : लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा' मधील डॉ हाथी यांच्या आकस्मित निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला. डॉ हाथी यांच कॅरेक्टर साकारणाऱ्या अभिनेता कवि कुमार आझाद यांच्या मृत्यूमुळे चाहते देखील दुःखी झाले आहेत. आता त्यांच्या डॉक्टरांनी मोठा खुलासा केला आहे यामुळे चाहत्यांना आणखीनच धक्का बसला आहे. ज्या डॉक्टरांनी त्यांची अनेक वर्षापूर्वी बॅरिएट्रिक सर्जरी केली आहे त्यांनी सांगितलं की, आझाद मुद्दामूनआपलं वजन कमी करत नव्हता. वजन वाढवण्याकडे त्यांचा कल सर्वाधिक होता.
वेबसाइट 'स्पॉटबॉय'च्या रिपोर्टनुसार, डॉ लकडावाला यांनी सांगितलं की, अभिनेता कवी कुमार आझाद आपलं वजन कमी करण्यास तयार नव्हते. त्यांना असे वाटे की, जर माझं वजन कमी झालं तर मला काम नाही मिळणार. डॉक्टरांनी सांगितलं की, मी त्यांना पुन्हा एकदा बॅरिएट्रिकची सर्जरी करण्याचा सल्ला दिला. तेव्हा अभिनेता कवी म्हणाले की, मी जर वजन कमी केलं तर मी पडद्यावर जाडा दिसणार नाही. डॉक्टरांनी सांगितले की, आठ वर्षापूर्वी शुटिंग करताना आझाद पडला होता. तेव्हा त्याला वेंटिलेटरवर ठेवलं होतं. वजन अधिक असल्यामुळे त्यांची तब्बेत बिघडली होती. तेव्हा त्यांच वजन 265 किलो होतं. तेव्हाच डॉक्टरांनी त्यांला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. ऑपरेशननंतर त्यांच वजन 140 किलो झालं होतं. यानंतर पुन्हा तो कामावर रूजू झाला होता.
पुन्हा डॉक्टरांनी आझाद यांना बॅरिएट्रिक सर्जरी करण्याचा सल्ला दिला होता. मात्र तो कधीच पुन्हा डॉक्टरांना भेटायला गेला नाही. पुन्हा सर्जरी केल्यावर त्यांच वजन 90 किलोग्रॅम झालं असतं. तसेच डॉक्टरांनी स्क्रिनवर जाड दिसण्याकरता पॅडिंगचा देखील सल्ला दिला होता. मात्र तेव्हा आझाद सांगे की, त्यांचा चेहरा जाडा दिसणार नाही.