'गदर 2' नंतर सनी देओलची लॉटरी; अभिनेत्याला दिली 95 कोटींची ऑफर!

सनी देओलचा 'गदर 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत होता. या सिनेमाने कमाईच्या बाबतीत अनेक रेकॉर्ड्स मोडले. आता अभिनेत्याच्या चाहत्यांसाठी गुडन्यूज समोर येत आहे. 

Updated: Oct 2, 2023, 12:56 PM IST
'गदर 2' नंतर सनी देओलची लॉटरी; अभिनेत्याला दिली 95 कोटींची ऑफर! title=

मुंबई : नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार सनी देओल त्याच्या पुढच्या चित्रपटासाठी दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांच्याशी बोलत आहेत. विशेष म्हणजे आमिर खान त्याच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करू शकतो.

पुढच्या वर्षी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होऊ शकतं
असं म्हटलं जात आहे की, झूमच्या अहवालानुसार, एका OTT प्लॅटफॉर्मने सनी आणि आमिरला चित्रपटाच्या विशेष हक्कांसाठी 95 कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. पुढील वर्षी या चित्रपटाचं शूटिंग सुरू होऊ शकतं. मात्र, सनी देओलने याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. 19 ऑक्टोबर रोजी आमिर आणि सनी त्यांच्या सहकार्याची घोषणा करतील.

सनीच्या चित्रपटात आमिर सहाय्यक दिग्दर्शक होता
सनी आणि संतोषी यांनी यापूर्वी 'घायल', 'घातक' आणि 'दामिनी' सारखे हिट चित्रपट दिले आहेत. मात्र आमिर आणि सनीने आजपर्यंत एकत्र स्क्रीन शेअर केलेली नाही. मात्र, 1985 मध्ये रिलीज झालेल्या सनी स्टारर चित्रपट 'जबरदस्थ'मध्ये आमिर खान सहाय्यक दिग्दर्शक होता. हा चित्रपट त्याचे काका नासिर हुसैन यांनी दिग्दर्शित केला होता.

आमिर आणि सनीच्या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर तीनदा टक्कर झाली आहे. आमिर आणि सनीने कधीही एकत्र काम केलं नसलं तरी दोघांमध्ये तीनदा टक्कर झाली आहे. 

अनेक दिग्दर्शक सनीच्या संपर्कात आहेत
'गदर 2'च्या यशानंतर सनीला बॉलिवूडमधील अनेक नामवंत दिग्दर्शकांनीही संपर्क साधला आहे. एका चित्रपटासंदर्भात सनीने अब्बास-मस्तान या दिग्दर्शक जोडीसोबत बैठक घेतल्याची चर्चा आहे. हा एक अॅक्शन-थ्रिलर चित्रपट आहे ज्यासाठी सनीने आतापर्यंत फक्त आयडिया घेतली आहे.

गदर-3 वरही चर्चा सुरू आहे
सनी 'बॉर्डर' फेम दिग्दर्शक जेपी दत्ता यांच्यासोबत एका चित्रपटाचीही चर्चा करत आहे. हे 'बॉर्डर 2' वर असल्याची चर्चा होती. यावर अद्याप कोणतीही पुष्टी झालेली नाही. याशिवाय 'गदर' फेम दिग्दर्शक अनिल शर्मासोबतही सनी मालिकेच्या तिसऱ्या पार्टची चर्चा करत आहे. मात्र, सनीने अद्याप त्याच्या पुढील चित्रपटाची घोषणा केलेली नाही.