Sukanya Mone Trolled: सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होतना दिसतात. अभिनेत्रींचेही व्हिडीओही व्हायरल होयला फारच वेळ लागत नाही. 'बाईपण भारी देवा हा' चित्रपट जूनमध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची सोशल मीडियावर जोरात चर्चाही होती. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक कमाई केली आहे. आत्तापर्यंत हा चित्रपट 90 कोटींच्या घरात गेला आहे. त्यावेळी मोठ मोठे बॉलिवूड चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर गाजत असताना त्यातून पुढे 'गदर 2' सारखा सिनेमा येऊनही या चित्रपटानं जोरदार कमाई केली होती. महिलावर्ग, पुरूषवर्ग तसेच तरूणांनी हा चित्रपट आनंदाने एन्जॉय केला. सध्या सुकन्या मोने यांच्या एका कमेंटची चर्चा आहे. या चित्रपटातून वंदना गुप्ते, रोहिणी हट्टंगणी, सुकन्या मोने, दिपा परब, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली होती. या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिसवरील यशाच्या निमित्तानं या चित्रपटातील स्टारकास्टनं जंगी सेलिब्रेशन केले होते. त्याचे व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
यावेळी सुकन्या मोने यांचा एक व्हिडीओही जोरदार व्हायरल झाला होता. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा होती. यावेळी सगळ्या टीमनं या जंगी सेलिब्रेशनचा आनंद लुटला होता. सगळ्यांनी मनसोक्त डान्स केला होता. त्यामुळे सुकन्या मोनेंचीही जोरात चर्चा होती. यावेळी त्यांचा एनर्जीनं भरलेला डान्स हा तुफान व्हायरल झाला होता. त्यावेळी अनेकांनी त्यांचे कौतुक केले होते. परंतु त्यांनी अनेकांनी त्यांच्या या डान्सवरून ट्रोलही केले होते. काहींनी दारू जास्त झाली आहे का? वजन वाढलं आहे, म्हातारचळं लागलं आहे. अशा टोकाच्या प्रतिक्रियाही दिल्या होत्या. त्यामुळे त्यांना ट्रोल करण्यात आळे होते. अशाप्रकारे मराठी अभिनेते, अभिनेत्री हे सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल होताना दिसतात. काहीवेळेला कलाकार यावर रिएक्ट होतात तर काहीवेळी कलाकार यावर प्रतिक्रिया देतही नाहीत.
हेही वाचा : VIDEO: आईचा हात पकडून चालताना वैतागली 12 वर्षांची आराध्या? कॅमेऱ्यात कैद
त्यांच्या अशाच एका व्हिडीओखाली एका ट्रोलरनं टीका केली होती. की त्या खूप ओव्हर ड्रक आहेत. यावर आता सुकन्या मोने यांनी रिप्लाय दिला आहे. त्या म्हणाल्या की, ''संगीताची नशा, यशाची नशा आहे ही बाकी काही नाही.'' सध्या त्यांच्या या कमेंटनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्तानं 'बाईपण भारी देवा' चित्रपटाची टीम ही मुंबईचा राजाच्या दर्शनाला गेली होती. सोबतच काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गणेशोत्सवाच्या निमित्तानंही त्यांनी हजेरी लावली होती.