Video : महिलांचा विनयभंग, मुलं जखमी...; चेंगराचेंगरीमुळे एआर रहमानवर भडकले चाहते

AR Rahman concert : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान यांच्या चेन्नईतील लाईव्ह कॉन्सर्टबाबत प्रेक्षकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. या कार्यक्रमाच्या ठिकाणी महिलांचा विनयभंग करण्यात आल्याचा दावा नेटकऱ्यांनी केला आहे.

आकाश नेटके | Updated: Sep 11, 2023, 10:51 AM IST
Video : महिलांचा विनयभंग, मुलं जखमी...; चेंगराचेंगरीमुळे एआर रहमानवर भडकले चाहते title=

AR Rahman concert : ऑस्कर विजेता प्रसिद्ध संगीतकार एआर रहमान (AR Rahman) यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा गोंधळ झाल्याचे समोर आलं आहे. नियोजनाअभावी कार्यक्रमात चेंगराचेंगरी (stamped) झाल्याने रहमानच्या चाहत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एआर रहमानने 'माराकुमा नेंजाम'  (Marakkuma Nenjam) या त्याच्या चेन्नई कॉन्सर्टसाठी एका इव्हेंट कंपनीसोबत (ACTC) भागीदारी केली. मात्र ढिसाळ नियोजनामुळे या कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला होता. कार्यक्रमासाठी आलेल्या लोकांना रहमानसह आयोजकांविरोधात संपात व्यक्त केला आहे.

रविवारी चेन्नईच्या पनईयूर येथील आदित्यराम पॅलेसमध्ये एआर रहमानचा कॉन्सर्ट झाला. खराब व्यवस्थापनामुळे रहमान आणि कार्यक्रमाच्या आयोजकांवर नेटकऱ्यांनी टीका केली आहे. यासंदर्भात एसीटीसी इव्हेंट्सने या घटनेबद्दल सोशल मीडियावरुन माफी मागितली आहे. या कार्यक्रमात अनेक महिलांचा कथितपणे विनयभंग करण्यात आला, मुले जखमी झाली असा आरोप करण्यात येत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांच्याकडे कार्यक्रमाची तिकिटे होते त्यांना गर्दीमुळे कार्यक्रमाच्या ठिकाणापर्यंत पोहोचताही आलं नाही. या कॉन्सर्टची अनेक दिवसांपासून चाहते वाट पाहत होते. मात्र, जेव्हा हा कार्यक्रम झाला तेव्हा चाहत्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांनी सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करून निकृष्ट व्यवस्थापनाविरोधात संताप व्यक्त केला आहे.

रविवारी एआर रहमानच्या 'माराकुमा नेंजाम' नावाचा कॉन्सर्टसाठी सुमारे 50,000 लोक सहभागी झाले होते. पण अनेकांनी सोशल मीडियावर अनेकांनी एआर रहमानवर निशाणा साधला आहे. हा कार्यक्रम 12 ऑगस्ट रोजी होणार होता. पण खराब हवानामामुळे जवळपास महिनाभर तो पुढे ढकलण्यात आला होता. त्यामुळे लोकांमध्ये आधापासून त्याच्याबाबत नाराजी होती. दुसरीकडे रविवारी झालेल्या प्रकारामुळे लोक आणखीनच संतापले आहेत.

 

आयोजकांनी दिली प्रतिक्रिया

या सगळ्या प्रकारानंतर एसीटीसी इव्हेंट्सने चाहत्यांची माफी मागितली आहे. "चेन्नई आणि एआर रहमान यांचे आभारी आहोत! अतुलनीय प्रतिसाद, प्रचंड गर्दीने आमचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात यशस्वी केला. ज्यांना गर्दीमुळे उपस्थित राहता आले नाही, त्यांची आम्ही माफी मागतो. आम्ही जबाबदार आहोत. आम्ही तुमच्यासोबत आहोत," अशी प्रतिक्रिया एसीटीसी इव्हेंट्सने एक्सवर दिली आहे.