'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...'

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांपासून दोन घोषणांची फारच चर्चा दिसून येत आहे. पहिली म्हणजे 'कंटेंगे तो बटेंगे' आणि दुसरी घोषमा 'एक है तो सेफ है'. या घोषणांचा नेमका अर्थ् काय हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Nov 17, 2024, 10:14 AM IST
'कंटेंगे तो बटेंगे', 'एक है तो सेफ है'वर CM शिंदे स्पष्टच बोलले! म्हणाले, 'मोदीजींनी कुठे...' title=
विशेष मुलाखतीत नोंदवलं मत

Maharashtra Assembly Election: महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या केंद्रस्थानी मागील काही दिवसांपासून राहिलेली घोषणा म्हणजे, 'कंटेंगे तो बटेंगे'! उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारात उडी घेतल्यानंतरपासून ही घोषणा चर्चेत आली. मात्र पंकजा मुंडे, अशोक चव्हाण यासारख्या स्वपक्षीयांनी 'कंटेंगे तो बटेंगे'वरुन भाजपाला घरचा आहेर दिल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा उल्लेख करत 'कंटेंगे तो बटेंगे'चा अर्थ 'झी 24 तास'च्या 'टू द पॉइण्ट' या विशेष कार्यक्रमात सांगितला आहे.

'मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम...'

"मोदीजी जे म्हटलंय, 'एक है तो सेफ है' ते आपण जगात कुठेही गेलो तरी सेफ वाटते याबद्दल म्हटल्याचा दावा मुख्यमंत्री शिंदेंनी केला आहे. जगात कुठेही गेलं तरी सेफ वाटतं हे पहिले का नव्हतं वाटत? असा सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उपस्थित केला आहे. "लोकसभेत महाविकास आघाडीने वाटा आणि राज्य करा असं केलं," असा दावाही मुख्यमंत्र्यांनी केला. तसेच 'कंटेंगे तो बटेंगे' वर प्रतिक्रिया नोंदवताना मुख्यमंत्री शिंदेंनी, "मोदीजींनी कुठे म्हटलं हिंदू-मुस्लिम वेगळे व्हा?" असा प्रतिसवाल विचारला.  

...म्हणून मोदीजी तसे बोलले

अजित पवारांनी 'कंटेंगे तो बटेंगे'वर प्रतिक्रिया दिली होती त्यावरही मुख्यमंत्री बोलले. "तुम्ही वेगळे होऊ नये एकत्र या असे ते म्हणतात. यामध्ये कोणता अर्थ काढायच्या ते ज्यांनी त्यांनी ठरवावे. लोकांनी एकत्र येऊन, मतदान वाढवण्यासाठी मोदीजी तसे बोलले," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. महाविकास आघाडीला का विचारात नाही? त्यांनी का आवाहन केले आणि खोटे फर्मान लोकसभेच्या वेळी काढले? असे सवालही मुख्यमंत्री शिंदेंनी उपस्थित केला. 

धर्म न पाहता योजना दिल्या

लाडकी बहीण, वीज बिल माफ अश्या योजनांमध्ये आम्ही कोणाला वगळले का? आम्ही सर्वांना योजना दिल्यात त्यात आम्ही जात धर्म पहिला नाही. माझी स्पष्ट भूमिका आहे, आम्ही विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवावी आणि सर्वांनी एकजुटीने यावे असे म्हणतोय," असंही शिंदे म्हणाले. 

आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे

"आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे आहोत. हिंदुत्व आमच्या बरोबर आहे ना? ठाकरेंबरोबर काँग्रेसची व्होट बँक आहे. ही फक्त सूज आहे," असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

नक्की वाचा >> राज ठाकरेंच्या 'फडणवीस मुख्यमंत्री होणार' विधानावर शिंदे पहिल्यांदाच बोलले! अवघ्या 4 शब्दात दिलं उत्तर

चिन्ह व पक्ष ज्याच्याकडे...

"लोकसभेच्या वेळी खोट बोलून लोकांना फसवले. राज्य सरकार कसे काय संविधान बदलू शकते? महाविकास आघाडीने बरोबर मौका साधून लोकांना घाबरवले," असा आरोपही मुख्यमंत्र्यांनी केला. "चिन्ह व पक्ष ज्याच्याकडे बहुमत त्यांच्याकडे आहे. बहुमताला महत्व आहे. आणि आमच्याकडे बहुमत आहे," असं मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.  

काँग्रेसने गडबड केलीय ईव्हीएममध्ये?

"त्यांच्या बाजूने निकाल दिला तर यंत्राणा चांगली नाहीतर वाईट. ईव्हीएम ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी काँग्रेसचे सरकार आले मग तिथे काय काँग्रेसने गडबड केलीय ईव्हीएममध्ये?" असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उफस्थित केला. जास्तीत जास्त जागा लढवण्यासंदर्भात बोलताना "लोकांची अपेक्षा असते, कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की ही जागा आम्ही लढवावी. एवढी अंडरस्टँडिंग सेना आणि भाजपमध्ये असली पाहिजे. मुख्यमंत्री बाबत आमच्यात स्पर्धा नाही आम्ही टीम बनून काम करतो. आमचे सरकार बहुमताने कसे येईल याकडे लक्ष आहे," असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे.