'आदिपुरूष'नंतर प्रभास दिसणार भगवान शंकराच्या भूमिकेत?

Prabhas in Lord Shiva Role: प्रभासचा यावर्षी मोस्ट अवेडेट चित्रपट आदिपुरूष रिलिज झाला होता. परंतु हा चित्रपट काही केल्या बॉक्स ऑफिसवर हवा तसा चालला नाही. आता प्रभास आगामी चित्रपटातून शंकराच्या भुमिकेतून दिसणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 10, 2023, 06:38 PM IST
'आदिपुरूष'नंतर प्रभास दिसणार भगवान शंकराच्या भूमिकेत?  title=
actor prabhas going to play lord shiva in his upcoming film after failure of adipurush

Prabhas in Lord Shiva Role: सध्या सोशल मीडियावर चर्चा आहे ती म्हणजे प्रभासची. समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की आता प्रभास हा आता शंकरदेवाच्या भुमिकेतून दिसणार आहे. यावर्षी जूनमध्ये प्रभासचा आदिपुरूष हा चित्रपट प्रदर्शित झाला होता परंतु या चित्रपटाला प्रेक्षकांनी नाकारले. आदिपुरूष हा चित्रपट सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आला होता. चुकीचे संवाद, राम, रावण, सीता, हनुमा यांचे चुकीचे आणि निष्काळीपणाने केलेले चित्रण, त्यानंतर फसलेली कथा आणि यामुळे आदिपुरूष या चित्रपटाला हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. या चित्रपटाची गेल्या एक वर्षापासून जोरात चर्चा होती.

परंतु प्रेक्षकांनी या चित्रपटाला एकप्रकारे बॉयकॉटचं करून टाकले. आमिर खानच्या लाल सिंग चड्ढानंतर आदिपुरूष या चित्रपटाची चर्चा होती. त्यामुळे हा चित्रपट चालला नाही. आता रामायणातील प्रभु रामाच्या भुमिकेनंतर शंकराच्या भुमिकेतून दिसणार असल्याची चर्चा आहे. 

हेही वाचा : बडीशेप खाण्याचे फायदे वाचाल तर म्हणाल, 'रोजच खायला हवेत'

ट्रेड एक्सपर्ट रमेश बाला यांनी एक ट्विट केलं आहे ज्यातून त्यांनी याबद्दलची माहिती दिली आहे. सोबत निर्माते विष्णु मंचू यांनी याबद्दल पुष्टी केली आहे. बाहुबलीनंतर अभिनेता प्रभासची क्रेझ ही प्रचंड वाढली होती. त्याच्या लोकप्रियतेतही प्रचंड वाढ झाली होती. या चित्रपटाची गाणी आणि कथा प्रेक्षकांना फारच आवडते. आजही प्रभासला त्याच्या या भुमिकेसाठी ओळखले जाते. त्यानंतर प्रभासचे अनेक चित्रपटही गाजले होते. त्यापुर्वीही तो चित्रपटांतून कामं करत होता. परंतु जितकी लोकप्रियता ही त्याला बाहुबली या चित्रपटातून मिळाली तितकी याआधीकधीच मिळाली नसेल. त्यामुळे प्रभासची चांगली चर्चा रंगेलली असते. यावेळी त्याची पुन्हा एकदा चर्चा रंगलेली आहे. 

खात्रीशीर सूत्रांच्या माहितीनुसार रेबेल स्टार प्रभास हा लवकरच विष्णु मंचू यांच्या ड्रीम प्रोजेक्टमध्ये एक महत्त्वाची आणि मोठी भूमिका साकारणार आहे. त्या प्रोजेक्टचं नाव आहे ‘कन्नप्पा – अ ट्रू इंडियन एपिक’, असं ट्विट रमेश बाला यांनी केले आहे. तर हेच ट्विट रिट्विट करत विष्णु मंचू यांनी 'हर हर महादेव' असं लिहिलं आहे. क्रीती सननची बहीण नुपूर सनन हीसुद्धा त्याच्या या चित्रपटातून दिसणार आहे. मुकेश सिंग या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाची चित्रीकरण हे लवकरच सुरू होणार आहे. आता प्रभासचा 'कलकी 2898' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे.