बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन

बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 25, 2018, 03:26 PM IST
बॉलिवूडमधील महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री श्रीदेवी यांचं शनिवारी रात्री हृदयविकाराच्या धक्क्याने दुबईत निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या.

बालवयापासूनच अभिनयाला सुरूवात

श्रीदेवी यांच्या निधनाच्या बातमीला त्यांचा दीर संजय कपूर यांनी दुजोरा असून त्या आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवला आहे. त्यांनी अभिनयाची सुरुवात लहान असतानाच सुरु केली होती. 1978 साली सोलहवाँ सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे.

उत्कृष्ट अभिनयासोबत अनेक पुरस्कार

बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गावाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना 2013 साली भारत सरकारकडून पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होतं. याशीवाय त्यांना आतापर्यंत पाच फिल्मफेयर पुरस्कारही मिळालेत..