'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई

आलिया भट्टची आई सोनी राजदान यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन त्या कशा प्रकारे सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावल्या याबद्दल सांगितलंय. 

नेहा चौधरी | Updated: May 19, 2024, 01:03 PM IST
'दिल्ली कस्टम्समधून बोलतोय, तुम्ही बेकायदेशीर ड्रग्स विकत..,' सायबर गुन्ह्यातून थोडक्यात बचावली Alia Bhatt ची आई title=
Speaking from Delhi customs you are selling illegal drugs Alia Bhatt mother soni razdan escaped cyber crime

Soni Razdan Scammed : गेल्या काही वर्षांमध्ये सायबर गुन्ह्यांमध्ये वाढ झालीय. सर्वसामान्यांसोबत काय या जाळ्यात बॉलिवूड सेलिब्रिटीही अडकले आहेत. ऑनलाइन फसवणुकीमुळे अनेक सेलिब्रिटींना लाखोंचे नुकसान सहन करावे लागले आहेत. आयेशा श्रॉफ, शबाना आझमी आणि नम्रता शिरोडकर यांच्यासोबत हा प्रकार घडला आहे. या यादीत आता आलिया भट्टची आई सोनी राजदान यांचं नाव जोडल्या गेलंय. सोनी राजदान ऑनलाईन फसवणुकीतून थोडक्यात बचावल्या आहेत. या घटनेबद्दल त्यांनी एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. 

आलिया भट्टच्या आईवर ड्रग्ज ऑर्डर केल्याचा आरोप?

सोनी राजदानने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, त्यांच्यासोबत कसा स्लॅम होताता राहिला. त्यांनी लिहिलंय की, ''आमच्या आजूबाजूला एक मोठा घोटाळा सुरू आहे. कोणीतरी मला फोन केला आणि सांगितलंय की, तो दिल्ली कस्टरम्समधून बोलत आहे. त्याने मला सांगितलं की, मी काही बेकायदेशीर ड्रग्सची ऑर्डर दिली आहे. त्याने मला फोन केला आणि सांगितलं की तो पोलिसांशीही जोडला आहे. ''
''हे प्रकरण दडपण्याच्या नावाखाली त्याने माझ्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केला. त्याने माझा आधार कार्ड क्रमांक विचारला. मला ज्याप्रमाणे कॉल आला तसाच कॉल माझ्या ओळखीच्या लोकांनाही आला आहे. ही लोक तुम्हाला कॉल करुन घाबरवतात, धमकावतात आणि तत्सम प्रकार करतात. तुमच्याकडून भरपूर पैसे काढून घेण्याचा प्रयत्न करतात.''  (Speaking from Delhi customs you are selling illegal drugs Alia Bhatt mother soni razdan escaped cyber crime)

सोनी राजदानने चाहत्यांना सल्ला 

ही पोस्ट करण्यामागे सोनी राजदाने यांनी चाहत्यांसोबत अस घडू नये यासाठी सल्ला दिलाय. ''मुद्दा हा आहे की तुम्ही या लोकांच्या शब्दात अडकू नका आणि त्यांची दिशाभूल करू नका. मी अशा व्यक्तीला ओळखतो, जो त्यांच्या बोलण्याने प्रभावित झाला आणि त्याने खूप पैसे ट्रान्सफर केले. हे कोणासोबतही घडू नये म्हणून मी ही पोस्ट शेअर करत आहे.''

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Soni Razdan (@sonirazdan)

त्यांनी सांगितलं की, मला या फोन करणाऱ्या माझी फसवणूक करत आहे याची कल्पना आली. मी आधार कार्ड नंबर देण्यास नकार दिला आणि फोन कॉल डिस्कनेक्ट केला. हे प्रकरण भीतीदायक आहे. पण जेव्हा तुम्हाला असे कॉल येतात तेव्हा त्यांचा नंबर सेव्ह करा आणि पोलिसांकडे तक्रार करा.