रात्रीच्या अंधारात 'या' अवस्थेत अभिनेत्री स्पॉट, कॅमेरा पाहाताच ठीक करु लागली कपडे

मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. येथे सगळेच लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात.

Updated: May 5, 2022, 07:40 PM IST
रात्रीच्या अंधारात 'या' अवस्थेत अभिनेत्री स्पॉट, कॅमेरा पाहाताच ठीक करु लागली कपडे title=

मुंबई : मुंबई हे स्वप्नांचं शहर आहे. येथे सगळेच लोक आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. येथे काहींना आपलं स्वप्न पूर्ण सरण्याची संधी मिळते, तर काही लोक संधीच्या शोधात फिरतात. तसेच अनेक मॉडल किंवा अभिनयक्षेत्रातील लोक आपलं नशीब आजमवण्यासाठी इंडस्ट्रीत येतात. त्यांपैकी एक आहे सोनाली राऊत. कॅलेंडर गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेली सोनाली राऊत तिच्या हॉट फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवते. आता त्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे, जो खूप चर्चेत आहे.

सोनालीने पापाराझींसमोर असे काही केले आहे, ज्यामुळे तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

खरं कर सोनाली राऊत 'बिग बॉस'चा माजी स्पर्धक राहुल महाजनची पत्नी नताल्या इलिनाच्या वाढदिवसाच्या पार्टीत सहभागी होण्यासाठी पोहोचली होती. यादरम्यान पापाराझींनी तिला पाहिले. 

सोनालीने ब्लॅक कलरच्या वन-पीस ड्रेस घातला होता, जो ट्रांसपर्ंट होता. या ड्रेसमध्ये सोनाली खूपच हॉट दिसत आहे. 

सोनाली राऊत पापाराझींसमोर येताच पोज देण्यापूर्वी आपला ड्रेस अ‍ॅडजस्ट करु लागली. ती तिचा वरचा ड्रेस फिक्स करत होती, तर कधी ड्रेसला ती खालच्या बाजूने खेचून सगळ करण्याचा प्रयत्न करत होती.

एकंदरीतच सोनाली या कपड्यांमध्ये हॉट दिसत असली, तरी ती स्वत: त्यामध्ये कंफर्टेबल दिसत नव्हती. ज्यामुळे लोकांनी तिला ट्रोल केलं आहे.

खरंतर सोनाली आपडे कपडे ठिक करत असतानाचा व्हिडीओ पापाराझींनी काढला, जो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. लोक यावर तिला वेगवेगळ्या प्रकारचे कमेंट्स करु लागले आहेत.

किंगफिशरची कॅलेंडर गर्ल

अभिनेत्री सोनाली राऊतने आपल्या जबरदस्त अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याच वेळी, लोक तिच्या मोहक अदांसाठी देखील वेडे आहेत.

सोनालीच्या प्रत्येक फोटोला आणि व्हिडिओला लाखोंच्या संख्येने लाईक्स मिळतात. वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी ती किंगफिशरची कॅलेंडर गर्ल बनली. मात्र, 'बिग बॉस'च्या ८व्या सीझनपासून तिला खरी लोकप्रियता मिळाली.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

8 वर्षांपूर्वी या चित्रपटात दिसली

उल्लेखनीय आहे की, सोनाली राऊत 2014 साली रिलीज झालेल्या 'द एक्सपोज' चित्रपटात हिमेश रेशमियासोबत दिसली होती. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत होती.

बिपाशा बसू आणि करण सिंग ग्रोव्हरसोबत 'डेंजरस' या वेब सीरिजमध्ये ती शेवटची दिसली होती. सोनाली सध्या चित्रपटसृष्टीपासून दूर असली तरी ती सोशल मीडियावर मात्र फारच सक्रीय आहे.