अभिनेत्रीने शेअर केले हॉट फोटो... सोशल मीडियावर फोटो व्हायरल

तुम्ही बॉलिवूडच्या एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री पाहिल्या असतील.  पण पाकिस्तानची हॉट अभिनेत्री पाहिली आहे का?

Updated: May 5, 2022, 08:07 PM IST
अभिनेत्रीने शेअर केले हॉट फोटो... सोशल मीडियावर फोटो व्हायरल  title=

Pakistan Hot Actress : तुम्ही बॉलिवूडच्या एकापेक्षा एक हॉट आणि बोल्ड अभिनेत्री पाहिल्या असतील. पण पाकिस्तानची हॉट अभिनेत्री पाहिली आहे का? तुम्ही पाहिले नसेल तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. यासोबतच त्या अभिनेत्रीच्या कामाबद्दलही सांगणार आहोत. पाकिस्तानी सिनेसृष्टी आपल्या नाटकांमुळे नेहमीच चर्चेत असते. (pakistani hot and bold actress mathira see photo)

पाकिस्तानी नाटकं जगभरातील अनेक चाहत्यांना आवडतात.  तिथली फिल्म इंडस्ट्री खूपच लहान आहे. तिथे काम खूप कमी प्रमाणात केलं जातं. त्यामुळे तिथले दोन-चार अभिनेत्र्या सोडल्या, तर बाकीच्यांची नावं इतर कोणालाच माहीत नाहीत.

पाकिस्तानी हॉट आणि बोल्ड अभिनेत्रीच्या नावाबद्दल बोलायचे तर ते नाव आहे मथिरा. मथिरा पाकिस्तानमध्ये तिच्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. पाकिस्तानात तिच्या चाहत्यांची कमी नाही. इंस्टाग्रामवर तिचे 1.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. मथिरा आपल्या चाहत्यांसाठी दररोज हॉट फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

मथिरा अहमद असं तिचं पूर्ण नाव आहे. ती एक मॉडेल, नर्तक, होस्ट, गायिका आणि अभिनेत्री आहे. मथिराचे वडील आफ्रिकन तर आई पाकिस्तानी आहे. तिचा जन्म झिम्बाब्वेमध्ये झाला. तिची बहीण रोज मोहम्मद देखील अभिनेत्री आहे. झिम्बाब्वेतील परिस्थिती बिकट असताना ते पाकिस्तानात आले होते.

मथिराने 2012 मध्ये पंजाबी गायक फरान जे मिर्झासोबत लग्न केलं. दोघांनाही एक मुलगा आहे. ज्याचे नाव अहिल रिझवी आहे. दरम्यान 2018 मध्ये फरान आणि मथिरा विभक्त झाले.