दुसऱ्या लग्नाची विषाशी तुलना करते लोकप्रिय अभिनेत्री

'कसोटी जिंदगी की' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री 

Updated: Nov 12, 2019, 01:50 PM IST
दुसऱ्या लग्नाची विषाशी तुलना करते लोकप्रिय अभिनेत्री  title=

मुंबई : टीव्हीची लोकप्रिय अभिनेत्री श्वेता तिवारी आपल्या वैवाहिक जीवनातील अशांतीवर पुन्हा एकदा प्रकाश टाकला आहे. श्वेताच्या दुसऱ्या लग्नानंतर पतीसोबत वाद होत आहेत. याबाबत तिला एका कार्यक्रमात प्रश्न विचारण्यात आल्यावर तिने सडेतोड उत्तर दिलं आहे. 

श्वेताचं अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न आहे. तिच्या या लग्नानंतरही वैवाहिक जीवन खूप क्लेशात आहे. सतत तिच्या दुसऱ्या लग्नानंतरचे वाद सर्वांसमोर येत आहेत. त्यावर ती म्हणते,'दुसऱ्यांदा वैवाहिक जीवनात अडथळे येऊ शकत नाहीत का? माझ्यात हिम्मत आहे...' जी गोष्ट पटत नाही त्यावर मी अतिशय मोकळेपणाने बोलत आहे. जी गोष्ट माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी योग्य नाही त्यावर मी बोलत आहे. 

मुलांच्या संगोपनासाठी जे योग्य पाऊल आहे ते मी उचलणार आहे. याकरता दुसऱ्यांदा प्रॉब्लेम झाला तर काय हरकत आहे. मी त्याला स्पष्ट सांगितलं आहे की, मला तुझ्यासोबत नाही राहायचं. दुसऱ्यांदा लग्न केलं म्हणजे सगळं सहन करायचं असं नाही ना. मी अन्यायाविरूद्ध उभी राहणार. 

तसेच श्वेता तिवारीने आपल्या दूसरं लग्न ही 'विषारी जखम' असल्याचं म्हटलं आहे. या जखमेतून मला बाहेर पडायचं होतं, असं श्वेता म्हणते. खासगी आयुष्यात श्वेता अतिशय खुश आहे. ती स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करते. 'मेरे डॅड की दुल्हन' या नव्या प्रोजेक्टमुळे श्वेता प्रचंड आनंदी आहे. 

श्वेसा आणि अभिनव यांना एक मुलगा आहे. तर श्वेता आणि तिच्या पहिल्या नवऱ्याची एक मुलगी आहे. या दोन्ही मुलांसाठी मी योग्य गोष्टीचीच बाजू घेणार असल्याचं श्वेता म्हणाली.