मुंबई : बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्यांच्या पत्नींना आपल्या पतीला ऑनस्क्रिन किस करतान पाहून संकोचल्यासारखं वाटतं. मात्र अभिनेता आयुष्मान खुरानाची पत्नी आणि दिग्दर्शक ताहिरा कश्यप याला अपवाद ठरली आहे. आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा सेम सेक्सवर आधारित सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत ताहिराने आपल्या पतीला आयुष्मान खुरानाने एका पुरूषाला किस केल्याच्या प्रश्नावर उत्तर दिलं आहे. ताहिरा म्हणते की,'मी आयुष्मानला स्क्रीनवर एका पुरूषाला किस करताना पाहण्यासाठी खूप उत्सुक आहे. आता मी आयुष्मानकडे कलाकार म्हणून पाहू लागली आहे. तसेच मी त्याच्या कामाचा सन्मान करतेय. कामासाठी तो एका पुरूषाला किस करू दे किंवा स्त्रीला. मी फक्त त्याचं कॅरेक्टर प्रति असलेल्या इमोशनला बघते.'
आयुष्मान खुरानाचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' सिनेमा 21 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. या सिनेमात तो एका 'गे' व्यक्तीची भूमिका साकारत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक या सिनेमाची वाट पाहत आहे. सिनेमात जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि गजराव राव हे मुख्य भूमिकेत दिसरणार आहेत. या सिनेमाचं दिग्दर्शन हितेश केवल्याने केलं आहे.
आयुष्मान आपल्या सिनेमांमुळे खूप चर्चेत आहे. बधाई हो, आर्टिकल 15 यासारख्या वेगवेगळ्या विषयाचे सिनेमे त्याने साकारले आहेत. आयुष्मानच्या अभिनयाला फक्त प्रेक्षकांनीच नाही तर समिक्षकांनी देखील पसंत केलं आहे. आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' हा सिनेमा 'शुभ मंगल सावधान' सिनेमाचा सिक्वल आहे. या सिनेमात आयुष्मान एका पुरूषाशी विवाहबंधनात अडकणार आहे.