गायिका श्रेया घोषाल हिने मुलाचं नाव काय ठेवलं पाहा, फोटो शेअर

श्रेयाने 22 मे रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. आता श्रेयाने मुलाची पहिली झलक शेअर करत मुलाचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे. 

Updated: Jun 2, 2021, 02:09 PM IST
गायिका श्रेया घोषाल हिने मुलाचं नाव काय ठेवलं पाहा, फोटो शेअर title=

मुंबई : आपल्या आवाजने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी गायिका श्रेया घोषालच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. त्यामुळे घोषाल कुटुंबात आनंदाचं वातावरण आहे. श्रेयाने 22 मे रोजी गोंडस मुलाला जन्म दिला. आता श्रेयाने मुलाची पहिली झलक शेअर करत मुलाचं नाव चाहत्यांना सांगितलं आहे. सोशल मीडियावर तिने मुलाचा फोटो शेअर केला. श्रेयाने तिच्या मुलाचं नाव देव्यान मुखोपाध्याय असं ठेवलं आहे. 

श्रेयाने मुलाचा फोटो पोस्ट करत कॅप्शनध्ये, 'देव्यान मुखोपाध्यायसोबत ओळख करून देते. 22 मे रोजी त्याचं आगमन झालं आणि आमचं आयुष्य पूर्णपण बदललं.' अशाप्रकारे तिने स्वतःचा आनंद चाहत्यांसोबत शेअर केला. मुलाचा जन्म झाला तेव्हा देखील तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. 

पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये, 'देवाने आशिर्वादाच्या रुपात आम्हाला मौल्यवान मुलगा दिला आहे. याआधी अशी  भावना कधीच अनुभवली नव्हती. मी आणि आमचं कुटुंब आनंदात आहोत. तुम्हा सर्वांच्या आशिर्वादासाठी धन्यवाद..' असं म्हणतं तिने आनंद व्यक्त केला. 

श्रेयाने 2015मध्ये प्रियकर शिलादित्य मुखोपाध्यायसोबत लग्न केलं.  शिलादित्य मुंबईतील एका  एका टेक्नॉलोजी कंपनीचा मालक आहेत. श्रेया कायम सोशल मीडियावर पतीसोबत फोटो पोस्ट करत असते.