काकानेच केला या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार; अभिनेत्रीच्या वक्तव्याने एकच खळबळ

प्रसिद्ध अभिनेत्री कुब्रा सैत हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. 

Updated: Jun 27, 2022, 09:18 PM IST
काकानेच केला या प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीवर बलात्कार; अभिनेत्रीच्या वक्तव्याने एकच खळबळ title=

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री कुब्रा सैत हिने एक खळबळजनक खुलासा केला आहे. तिने सांगितलं की, तिच्या काकांनी वयाच्या 17 व्या वर्षी तिच्यावर बऱ्याचदा  शारीरिक अत्याचार केले. कुब्रा सैतने सांगितलं की, तिचं कुटुंब बंगळुरूला शिफ्ट झालं तेव्हा ती एका रेस्टॉरंटमध्ये गेली होती. जिथे त्यांची तिथल्या मालकासोबत ओळख झाली. रेस्टॉरंटचा मालक हळूहळू कुटुंबाच्या जवळ येऊ लागला.

कुब्रा सैतने पुढे सांगितलं की, रेस्टॉरंटच्या मालकाचं हळू-हळू घरी येणं जाणं सुरु झालं.  आणि तो त्यांच्या जवळची व्यक्ती बनू लागला. तो माणूस कौटुंबिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू लागला. एकदा तिचं आई-वडिलांशी वाद झाला तेव्हा ती काकांकडे गेली.

यादरम्यान त्या व्यक्तीने संधीचा फायदा घेत कुब्रा सैतसोबत शारीरिक संबंध ठेवायचे नसताही तिच्यावर शारिरीक संबध ठेवले. या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली की, तिला वर्जिनीटी गमावल्यासारखं वाटत होतं पण त्यावेळी मी त्यांना विरोध केला नाही कारण मला भीती वाटत होती. यादरम्यान अभिनेत्रीने तिच्या कुटुंबाशी संबंधित इतरही अनेक मोठे खुलासे केले आहेत, जे जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.