एक वर्षाच्या मुलीसोबत शिल्पाचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; शिल्पाचे रिपोर्ट मात्र...

सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत आहे. 

Updated: May 7, 2021, 04:24 PM IST
एक वर्षाच्या मुलीसोबत शिल्पाचं संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात; शिल्पाचे रिपोर्ट मात्र... title=

मुंबई : कोरोनाचा हाहाकार सध्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. आता तर अनेक सेलिब्रिटी आणि त्यांच्या कुटुंबाला देखील कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त समोर येत असतानाचं अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या संपुर्ण कुटुंबाला कोरोनाची लागण झाली आहे. काही क्षणापुर्वीचं शिल्पाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. शिल्पाच्या या पोस्टनंतर तिचे चाहते लवकरात लवकर शिल्पा या संकटातून बाहेर येण्यासाठी प्रार्थना करत आहेत. 

शिल्पा सोशल मीडियावर एक पोस्ट करत म्हणाली, 'गेले 10 दिवस माझ्या कुटुंबासाठी फार त्रासदायक होते. माझ्या  सासू-सासऱ्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर माझी मुलगी समीशा, मुलगा विवान, राज, माझी आई यांना देखील कोरोना झाला आहे. सर्व जण त्यांच्या खोलीत आयसोलेशनमध्ये आहेत.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

'अधिकृत नियमांचे आम्ही पालन करत आहोत. आमच्याकडे काम करणाऱ्या दोघांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.' असं शिल्पाने पोस्टच्या माध्यमातून सांगितलं आहे. कुटुंबातील सर्वांचा कोरोनाची लागण झाली असून शिल्पाचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. 

शेवटी शिल्पाने नागरिकांना नियमांचं पालन करण्याचं आवाहन देखील केलं आहे. 'मास्क लावा. घरातून बाहेर पडत असाल तर काळजी घ्या.' असं सांगतं तिने सर्वांना नकारात्मक वातावरणात सकारात्मक राहण्यास सांगितलं आहे.