Shahid Mira Relationship: बायकोच्या मुठीत शाहीद, परवानगीशिवाय 'ही' गोष्ट अशक्यच

सर्वसामान्य पुरुषांप्रमाणेचं प्रसिद्ध अभिनेता शाहीद कपूर देखील बायकोच्या मुठीत, तिच्या परवानगीशिवाय ...  

Updated: Apr 26, 2022, 11:44 AM IST
Shahid Mira Relationship: बायकोच्या मुठीत शाहीद, परवानगीशिवाय 'ही' गोष्ट अशक्यच  title=

मुंबई : अभिनेता शाहीद कपूर (Shahid Kapoor) सध्या त्याच्या 'जर्सी' (Jersey) सिनेमामुळे चर्चेत आहे. सिनेमात शाहीद सोबत अभिनेत्री मृणाल ठाकूर आणि पंकज कपूर देखील मुख्य भूमिकेत दिसत आहेत. शाहिदची 'जर्सी' राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या तेलुगू क्रिडा नाटकाचा अधिकृत बॉलीवूड रिमेक आहे. शाहीद सिनेमा हीट करण्यासाठी प्रचंड मेहनत घेत आहे. नुकताचं झालेल्या मुलाखतीत शाहीदने त्याच्या वैवाहिक आयुष्याबद्दल अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. 

एका मुलाखीत शाहीदला 'तू पैशांची बचत करतोस की वायफळ खर्च करतोस?', या प्रश्नाचं उत्तर देताना शाहीद म्हणाला, 'आधी मी माझे पूर्ण पैसे खर्च करत होतो. पण आता मला पैसे खर्च करण्याआधी विचार करावा लागतो....'

पुढे शाहीद म्हणाला, 'माझं आता कुटुंब आहे. मुलगी, मुलगा आहे. पत्नी आहे... आता कोणतीही गोष्ट करण्याआधी मीराकडून परवानगी घ्यावी लागते. पैसे खर्च करण्याआधी पत्नीला विचारावं लागतं...' असं शाहीद म्हणाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लग्न झाल्यानंतर शाहीद प्रत्येक कामासाठी पत्नीची परवानगी घेतो. पण एक अशी गोष्ट आहे, ज्यासाठी शाहीद कधीचं पत्नीची परवानगी घेत नाही. त्याबद्दल देखील अभिनेत्याने यावेळी सांगितलं आहे. 

शाहीद म्हणाला, 'माझ्या बॉयस ट्रिपसाठी मी पत्नीची परवानगी घेतली नाही, तो माझा अधिकार आहे. मला वाटतं  मित्रांसोबत फिरायला जाणं प्रत्येक मुलाचा हक्क असतो.... 

कसं आहे शाहीद मीराचं नातं?
शाहीद आणि मीरा यांनी 2015 मध्ये लग्न केले. तेव्हापासून ते अनेकांना कपल्स गोल्स देत आहेत. शाहिद आणि मीरा यांना मीशा कपूर आणि झैन कपूर ही दोन मुले आहेत. 2017 मध्ये या दोघांना मीशा ही मुलगी झाली. जैन यांचा जन्म 2018 मध्ये झाला.

वडील होण्याच्या अनुभवावर शाहीद कपूर म्हणाला की, तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यात खूप आनंदी आहे. वडील झाल्यानंतर त्याच्यामध्ये खूप काही बदल झाले असून तो पूर्वीपेक्षा अधिक जबाबदार झाला आहे.