गौरी खानकडून शाहरुखबाबत मोठा खुलासा

शाहरुखच्या चित्रपटाबाबत गौरीचा खुलासा

Updated: Sep 13, 2019, 11:23 AM IST
गौरी खानकडून शाहरुखबाबत मोठा खुलासा title=

मुंबई : ९०च्या दशकातील 'बाजीगर' चित्रपट जबरदस्त गाजला. या चित्रपटातील 'ये काली काली आंखे' गाणंही चांगलंच सुपरहिट ठरलं होतं. आता शाहरुखची पत्नी गौरी खानने या चित्रपटाबाबत एक खुलासा केलाय. 'बाजीगर'मधील 'ये काली काली आंखे' या गाण्यासाठी शाहरुखचा लूक इंटीरियर डिझायनर आणि पत्नी गौरी खानने डिझाइन केला होता.

'मला विश्वास बसत नाही की मी ९०च्या दशकात, हँड प्रिंटेड जीन्स, लेगवार्मर टी, बुलेट बेल्ट आणि रेड शर्ट असा लूक डिझाइन केला होता.' असं गौरी खानने ट्विट करत म्हटलंय.

फोटोमध्ये शाहरुख प्रिंटेड जीन्ससह लाल रंगाच्या शर्टमध्ये दिसतोय. तर काजोल गुलाबी रंगाच्या ड्रेसमध्ये दिसतेय.

१९९३ मध्ये आलेल्या सुपरहिट 'बाजीगर'मधील 'ये काली काली आंखे' या गाण्याला अनु मलिक यांनी संगीत दिलं होतं.

शाहरुख कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मासोबत 'झिरो' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. सध्या शाहरुख निर्मितीकडे लक्ष देताना दिसतोय. काही दिवसांपूर्वी 'किंग खान' शाहरुखच्या रेडचिलीजने 'बार्ड ऑफ ब्लड' या वेबसीरीजची निर्मितीही केली आहे.