जेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण!

Shah Rukh Khan : शाहरुख खानचा जवान चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. त्याच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. तर दुसरीकडे शाहरुख हॉलिवूड चित्रपटसृष्टीच्या पदार्पणला नकार दिल्यामुळे चर्चेत आला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Sep 11, 2023, 01:30 PM IST
जेव्हा हॉलिवूडच्या दिग्गज निर्मात्याला शाहरुखने दिला होता नकार, दिले होते 'हे' कारण! title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan : बॉलिवूडचा किंग खान म्हणजे शाहरुख खानचा 'जवान' हा चित्रपट 7 सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाला. शाहरुख खानच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई केली आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 100 कोटींचा आकडा पार केला होता. तर चार दिवसात चित्रपटानं 500 कोटींचा आकडा पार केला आहे. पण तुम्हाला माहितीये एकदा शाहरुख हॉलिवूड चित्रपटाची ऑफर मिळण्यावर बोलला  होता. इतकंच नाही तर तो हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम का नाही करत याविषयी देखील सांगितलं होतं. 

2011 मध्ये शाहरुख खाननं खुलासा केला की त्याला हॉलिवूड दिग्दर्शक टोनी स्कॉट यांनी अनेक चित्रपटांच्या ऑफर दिल्या होत्या. त्यात टॉप गन, डेज ऑफ थन्डर आणि ट्रू रोमान्स होत्या. याशिवाय टॉम स्कॉट यांना हनुमान यांच्यावर आधारीत चित्रपट बनवायचा होता. शाहरुखनं याविषयी चित्रपट समिक्षक तरन आदर्श यांना दिलेल्या मुलाखतीत सांगितले की टोनी स्कॉट यांनी सुपरमॅन आणि बॅटमॅन सारखे चित्रपट येण्याआधी त्याच्यासोबत काही कॉन्सेप्ट शेअर केल्या होत्या. त्या चित्रपटांमध्ये सुपरहिरो म्हणून हनुमान जी यांना दाखवण्यात येणार होते. त्यात कशा प्रकारे हनुमान जी यांची शेपूट एखाद्या शस्त्रात कशी बदलते हे पाहायला मिळणार होतं. पण काही कारणांमुळे हा चित्रपट पुढे होऊ शकला नाही. तर 2012 मध्ये टोनी स्कॉट यांचे निधन झाले.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : अर्रर्र...! स्टेजवर धपकन पडली गौतमी पाटील, उड्या मारून नाचता-नाचता पाय घसरला!

दरम्यान, 2008 मध्ये जेव्हा शाहरुखला हॉलिवूड चित्रपटांमध्ये एन्ट्री करण्याविषयी प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यानं त्याचं मत स्पष्ट मांडलं होतं. खरंतर 2008 च्या बर्लिन फिल्म फेस्टिव्हलमध्ये शाहरुखला हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी शाहरुख नम्रतेनं म्हणाला की माझं इंग्रजी चांगलं नाही, त्यांच्याकडे जर एखाद्या मंद व्यक्तीची भूमिका असेल, ज्यात ती व्यक्ती बोलत नाही. मत काही होण्याची शक्यता आहे. तर पुढे शाहरुख म्हणाला की त्याचं वय आणि शरीरयष्टीत बदल झाल्यानं, त्यात अशा कोणत्याही गोष्टी नाही ज्या एका हॉलिवूड कलाकारासाठी महत्त्वाच्या आहेत. त्याशिवाय तो म्हणाला की त्याच्याकडे मारर्श आर्ट स्किल्स आणि त्यांना लागणारी उंची नाही, जी एका हॉलिवूड अॅक्शन स्टारसाठी गरजेची आहे. तर शाहरुखला भारतीय सिनेमाला पुढे घेऊन जायचं आहे. त्यासाठी तो दुसरीकडे जाण्याचा विचार करत नाही असं देखील त्यानं एका मुलाखतीत सांगितल्याचे म्हटले जाते.