राहुल गांधींनी विचारलं राजकारण्यांना काय सल्ला देशील? Shah Rukh Khan म्हणाला, "टेबलाखालून पैसे घेणे..."

Shah Rukh Khan's Suggestion to Rahul Gandhi :  राहुल गांधी यांनी एका कार्यक्रमात शाहरुख खानला प्रश्न विचारला होता की त्याला राजकारण्यांना कोणता सल्ला द्यायचा आहे. त्यावर शाहरुखनं दिलेल्या उत्तरानं सगळ्यांची मने जिंकली. त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 15, 2023, 12:52 PM IST
राहुल गांधींनी विचारलं राजकारण्यांना काय सल्ला देशील? Shah Rukh Khan म्हणाला, "टेबलाखालून पैसे घेणे..." title=
(Photo Credit : Social Media)

Shah Rukh Khan's Suggestion to Rahul Gandhi :  बॉलिवूडचा किंग खान आणि अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा त्याच्या हटके स्टाइलसाठी ओळखला जातो. त्याचं गाजलेले चित्रपट आणि अभिनयाचे तर लाखो चाहते आहेत. त्यासोबत शाहरुखची आणखी एक गोष्ट चर्चेत असते आणि ती म्हणजे त्याची बोलण्याची स्टाईल. बऱ्याचवेळा शाहरुखचे स्पीच किंवा मग तो कोणाशी बोलत असलेले व्हिडीओ व्हायरल होतात. त्यासोबत मुलाखतीतील त्याचे व्हिडीओ तर नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. त्याची बोलण्याची स्टाईल सगळ्यांनाच भुरळ पाडते. दरम्यान, शाहरुखचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख आणि कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यात सुरु असलेला संवाद पाहायला मिळतोय. तर शाहरुखं राजकारणींना एक सल्ला दिला आहे. 

शाहरुख खानच्या फॅशपेजवरून त्याचा हा जुना व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 2008 च्या या व्हिडीओत राहुल गांधी खुल्ल्या मंचावर शाहरुख खानला एक प्रश्न विचारतात. राहुल गांधी यांनी शाहरुखला विचारलं की राजकारण्यांना तू काय सल्ला देशील? राहुल गांधी यांचा प्रश्न ऐकताच शाहरुख आधी हसला आणि म्हणाला,  प्रश्नावर 'मला आनंद झाला की हा इतका सोपा प्रश्न आहे. मला फक्त एक सल्ला द्यायचा आहे. ज्याचे सर्व राजकारणी पालन करतील, आणि आपला देश अद्भुत बनेल… याशिवाय तुम्ही हा प्रश्न मला विचारला याची मी दाद देतो. मी खोटे बोलतो, फसवतो आणि जगण्यासाठी फसवणूक करतो कारण मी एक अभिनेता आहे, हा सगळा दिखावा आहे. माझ्याकडे खूप मोठा सल्ला असेल तर असं काही नाही.'

पुढे शाहरुख म्हणाला, 'देश चालवणाऱ्या किंवा ज्यांच्या मनात देश चालवण्याची इच्छा आहे अशा लोकांबद्दल माझ्या मनात खूप आदर आहे. कारण ही निस्वार्थ सेवा आहे. टेबलाखालून पैसे घेणे किंवा इतर गैरव्यवहार न करता आपण योग्य मार्ग अवलंबला तर आपण सर्वजण पैसे कमवू, आपण सर्व आनंदी राहू आणि आपण एक महान आणि अभिमानी राष्ट्र म्हणून उदयास येऊ. त्यामुळे सर्व राजकारण्यांना माझा एकच सल्ला आहे की कृपया प्रामाणिक रहा.'दरम्यान, या कार्यक्रमात अनेक राजकारण्यांनी हजेरी लावली होती. 

हेही वाचा : KGF 3 teaser : रॉकीचा भूतकाळ उलगडणार, 'केजीएफ 3' च्या टीझरनं प्रेक्षकांची उत्कंठा वाढली

दरम्यान, शाहरुख सगळ्यात शेवटी पठाणमध्ये दिसला होता. पठाण या चित्ररपटातून त्यानं तब्बल 4 वर्षांनंतर कमबॅक केलं होतं. त्या चित्रपटानं अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. आता त्याचा आगामी ‘जवान’ आणि 'डंकी' या चित्रपटाची त्याचे चाहते आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत.