Shah Rukh Khan meat Aryan Khan : बाप-लेकाच्या भेटीत नेमकं काय?

शाहरूख खानने तीन आठवड्याने घेतली लेकाची भेट 

Updated: Oct 21, 2021, 09:50 AM IST
Shah Rukh Khan meat Aryan Khan : बाप-लेकाच्या भेटीत नेमकं काय? title=

मुंबई : किंग खान शाहरूख खानने तब्बल 3 आठवड्यानंतर आर्यन खानची भेट घेतली. शाहरूख खान मुलाच्या भेटीकरता आर्थर रोड जेलमध्ये गेला. या दोघांमध्ये इतर कैद्यांप्रमाणे 10 मिनिटे भेट झाली. या भेटीत नेमकं काय झालं? याची माहिती दिली आमचे प्रतिनिधी प्रशांत अंकुशराव यांनी. 

प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, कैद्याचे जे भेटगृह असते त्यानुसारच शाहरूख खान आर्यनची भेट झाली. यावेळी आर्यन खानची आई गौरी खान देखील आर्यनच्या भेटीला गेली होती. इतर कैद्यांप्रमाणे शाहरूख आणि आर्यनची भेट झाली. कैदी आणि भेटायला येणाऱ्या व्यक्तीमध्ये दोन जाळ्या असतात.

गौरी, शाहरूख आणि आर्यन यांच्यात इतर कैंद्याप्रमाणे भेट झाली. कैद्यांना भेटण्यासाठी 10 मिनिटांचा वेळ असतो. तोच वेळ आर्यन खानला देखील देण्यात आला. यांच्यात 10 मिनिटे भेट झाली. मात्र या भेटीत नेमकं काय झालं ते अद्याप कळलेलं नाही. मात्र शाहरूख आणि गौरीने आर्यन खानला दिलासा दिला असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

इतर कैद्यांप्रमाणे आर्यन खानला आणि भेटायला येणाऱ्या व्यक्तीप्रमाणे शाहरूख खानला प्रशासनाने परवानगी दिली होती. सेलिब्रिटी असल्यामुळे कोणतीही वेगळी वागणूक देण्यात आली नाही.