Entertainment News : भारतीय टेलिव्हिजन विश्वात गाजलेल्या आणि कोणत्याही काळात कमालीची प्रेक्षकपसंती मिळवणाऱ्या मालिकांमध्ये येणारं एक नाव म्हणजे, 'साराभाई वर्सेस साराभाई'. रत्ना पाठक शाह, सतीश शाह, सुमीत राघवन, रुपाली गांगुली या आणि अशा कलाकारांचा दमदार अभिनय असणारी ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या मालिकेतील कलाकारही या न त्या कारणानं प्रकाशझोतात असतात. पण, याच साराभाई कुटुंबातील एक सदस्य म्हणजेच या मालिकेतील एक गाजलेलं पात्र साकारणार अभिनेता मात्र जवळपास दोन दशकं या कलाजगतापासून दूर होता.
हा अभिनेता म्हणजे राजेश कुमार. sarabhai... मध्ये 'रॉसेश' हे पात्र साकारणाऱ्या राजेशनं कधी एकेकाळी मुंबईसुद्धा सोडली होती. 2018 मध्ये तो बिहारमधील बरमा येथे पोहोचला होता. जिथं त्यानं सासाराम गावात शेती केली. यावेळी त्यानं बऱ्याच गोष्टींचा पहिल्यांदाच अनुभव घेतला होता. एका मुलाखतीमध्ये त्यानं आपण, पूरपरिस्थितीपासून इतर नैसर्गित आपत्ती आणि महामारीपर्यंतचा काळ या शेतीदरम्यान अनुभवल्याचं सांगितलं.
कर्जाचं ओझं आणि...
आपल्यावर कर्जाचं ओझं होतं, त्यातच शेती करत असतानासुद्धा मोठ्या नुकसानाचा सामा करावा लागला होता असं सांगताना त्यानं जीवनातील पडता काळ सर्वांपुढं ठेवला होता. 'माझ्या जीवनात एक असा पडता काळ आला होता जेव्हा मी खरंच कर्जबाजारी झालो होतो. माझ्या खिशात दमडीसुद्धा नव्हती. जीवनातील तो काळ अंधकारमय होता...', असं म्हणत त्यानं ते दिवस आठवले.
राजेश शेती करत असताना त्यानं सेंद्रीय शेतीच्या पद्धतीला प्राधान्य दिलं. 'मेरा फॅमिली फार्मर' नावानं त्यानं एक ब्रँड सुरु केला आणि या अंतर्गत त्यानं नैसर्गितरित्या उगवलेल्या भाज्या आणि फळं ग्राहकांना उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांशी हातमिळवणी केली. इथं मोठ्या सकारात्मकपणे तो पुढं येत गेला.
बऱ्याचदा कालकारांच्या अमुक एका भूमिकेला लोकप्रियता मिळाली, की त्यांना त्याच धाटणीच्या भूमिकांसाठी निवडलं जातं. ज्यामुळं एक कलाकार म्हणून या क्षेत्रात पुढे जाण्याच्या संधीही कमी होतात. इथं राजेशसोबतही तेच झालं. त्याला एकसारख्याच भूमिकांसाठी निवडलं जात होतं. एक वळण असंही आलं जेव्हा चांगली स्क्रीप्टसुद्धा त्याला मिळाली नाही. पण, परिस्थितीपुढं हात न टेकता सेंद्रीय शेती आणि अभिनयअशी सुरेख सांगत तो पुन्हा घालू लागला आणि या कलाजगतामध्ये त्यानं नव्यानं सुरुवातही केली. ज्यानंतर तो 'हड्डी', 'कोटा फॅक्ट्री 2' आणि 'ये मेरी फॅमिली सीजन 2' मध्येही काम करताना दिसला.