क्रिती सेनन ​​ते कियारा अडवाणी 'या' टॉप अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!

Bollywood Top Actress : बॉलिवूडमध्ये स्टिरिओटाईप ब्रेक करत या अभिनेत्री करतायत वेगवेगळ्या पठडीतील चित्रपट... अभिनेत्रींकडे आहेत हे मल्टी स्टारर चित्रपट

दिक्षा पाटील | Updated: Aug 3, 2023, 06:34 PM IST
क्रिती सेनन ​​ते कियारा अडवाणी 'या' टॉप अभिनेत्रींकडे आहेत मल्टी-स्टारर चित्रपट!  title=
(Photo Credit : Social Media)

Bollywood Actress : बॉलिवूड चित्रपटसृष्टी ही सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आज तर आपल्याला वेगवेगळ्या विषयावर चित्रपट करायला मिळतात. कलाकार वेगवेगळ्या पढडीचे चित्रपट करत सगळे स्टिरियोटाइप मोडून काही तरी वेगळ करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. सध्या काही दिवसांपासून सान्या मल्होत्रा, कियारा अडवाणी आणि क्रिती सेनन यासारख्या अनेक अभिनेत्री आहेत. या अभिनेत्री आजकाल वेगवेगळ्या मल्टी स्टारर चित्रपटांमध्ये दिसतात. त्यांचा एक वेगळात प्रवास होता आणि त्याचसोबत त्यांच्याकडे आता कोणते चित्रपट आहेत याविषयी जाणून घेऊया...

सान्या मल्होत्रा

नेहमीच उत्तम चित्रपट करून आपल्या उत्तम कामानं प्रेक्षकांची मन जिंकणारी म्हणून तिचं नाव घेतलं जात. सान्या मल्होत्रानं वेळोवेळी सिद्ध केले आहे की ती मल्टी-स्टारर चित्रपटांच्या आव्हानांपासून मागे हटणारी नाही. भावनिकरित्या भरलेल्या स्पोर्ट्स ड्रामा दंगलपासून ते हृदयस्पर्शी कॉमेडी-चित्रपट 'बधाई हो' आणि हटके कॉमेडी 'लुडो' पर्यंत सान्याने तिच्या मोहक कामगिरीने प्रेक्षकांवर छाप सोडली आहे. मल्टी-स्टारर प्रोजेक्ट्स व्यतिरिक्त, फोटोग्राफ, 'पगलेट' आणि 'कठल' यांसारख्या चित्रपटांमध्ये सान्याचा परफॉर्मन्सने सगळ्यांची मनं जिंकली.

कियारा अडवाणी

कियारा अडवाणी तिच्या हसऱ्या आणि नाजूक स्वभासाठी ओळखली जाते. तिने अनेक मल्टी-स्टारर चित्रपट केले आणि त्यातून तिनं प्रेक्षकांच्या मनात स्वतःचा ठसा उमटवला आहे. विनोदी चित्रपट 'गुड न्यूज', ब्लॉकबस्टर हॉरर-कॉमेडी 'भूल भुलैया 2' आणि हिट कौटुंबिक सिनेमा 'जुगजुग जीयो' यासारख्या चित्रपटांमधील तिच्या अभिनयाने सिद्ध केले आहे की ती नेहमीच दर्जेदार काम करू शकते. 

क्रिती सेनन

क्रितीच्या अप्रतिम अभिनय स्किल्ससह क्रिती सेननने मल्टी-स्टारर चित्रपटांमध्ये स्वत: ची जादू दाखवली आहे. स्टार-स्टडेड अॅक्शन-कॉमेडी 'दिलवाले'पासून ते 'हाऊसफुल 4' पर्यंत तिने इतर प्रतिभावान दर्जेदार कलाकारासोबत तिनं स्क्रिन शेअर केली आहे. 

हेही वाचा : धार्मिक श्रद्धेवरून ट्रोल होण्यावर सारा अली खाननं पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया, म्हणाली...

सान्या मल्होत्रासाठी दिग्गज शाहरुख खानच्या 

प्रसिद्ध केलेला जवान हा तिचा बहुप्रतिक्षित चित्रपट आहे, ज्यात दीपिका पदुकोण, नयनतारा आणि प्रियामणी यासारख्या अभिनेत्री झळकणार आहेत. जवानाशिवाय तिच्याकडे विकी कौशलसोबत सॅम बहादूर हा बहुचर्चित चित्रपट आहे.