'किती त्या ऱ्हस्व दीर्घच्या चुका..!' संकर्षण कऱ्हाडे मराठी शिक्षिकेसाठी पोस्ट करून झाला ट्रोल

Sankarshan Karhade Trolled : संकर्षण कऱ्हाडेनं मराठीच्या शिक्षिकेसाठी शेअर केली खास पोस्ट... मात्र, नेटकऱ्यांनीच घेतली शाळा...

दिक्षा पाटील | Updated: Aug 2, 2024, 01:41 PM IST
'किती त्या ऱ्हस्व दीर्घच्या चुका..!' संकर्षण कऱ्हाडे मराठी शिक्षिकेसाठी पोस्ट करून झाला ट्रोल title=
(Photo Credit : Social Media)

Sankarshan Karhade Trolled : कलाकार हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. त्यापैकी एक कलाकार म्हणजे अभिनेता संकर्षण कऱ्हाडे आहे. संकर्षनच्या कविता त्याच्या पोस्ट या कायमच चर्चेत राहतात. आता संकर्षणनं केलेली एक पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. मात्र, यावेळी या पोस्ट पेक्षा त्यावर नेटकऱ्यांनी केलेल्या पोस्टची चर्चा सुरु आहे. 

संकर्षणनं ही पोस्ट त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यानं सांगितलं की अमेरिकेत असलेल्या त्याच्या कवितांच्या कार्यक्रमात त्याच्या शाळेत शिकवणाऱ्या मराठीच्या शिक्षिका पोहोचल्या होत्या. त्यासोबत संकर्षननं त्याच्या मराठीच्या बाईंसोबतचा एक फोटो देखील शेअर केला आहे. त्यासोबत कॅप्शन देत संकर्षण म्हणाला, "माझ्या शाळेच्या “मराठीच्या बाईंनी मला बक्षीस दिलं हो… ”माझ्या परभणीतल्या शाळेत मला मराठी शिकवायला याच जपेबाई होत्या. नेहमी मला वर्गात उठवायच्या आणि "कऱ्हाडे, धडा वाच…", कऱ्हाडे, अक्षर अतिशय घाण आहे…, तुझं ऱ्हस्व-दीर्घ कधी सुधारणार…??? असं म्हणायच्या…पोरांना शिकायचा कंटाळा आला (जो नेहमीच आलेला असायचा) की त्या, “कऱ्हाडे… गाणं म्हण” असं म्हणायच्या… आज त्याच माझ्या मराठीच्या बाई कवितांच्या कार्यक्रमाला अमेरिकेत आल्या आणि त्यांनी मला कवितांसांठी बक्षीस दिलं. मला खूप भरून आलं. प्रेक्षकांना भेटतांना तसा मी शांत उभा असतो; पण बाई भेटायला आल्या आणि मला खरंच भीती वाटली… माझी आज शब्दांशी “जर मैत्री असेल… तर ती बाईंनीच करून दिलीये…“ हे नातं तेव्हाचं आहे जेव्हा शाळेतल्या बाईंना “बाईच” म्हणायचो... समजा, शाळेतले गुरुजी… भाजी मंडईत जरी दिसले तरी भीती वाटायची… आणि घाबरून चालत्या सायकलवरून उडी मारायचो… अभ्यासात मी कधीच हुशार नव्हतो आणि त्यामुळे तेव्हा बक्षीस मिळवून घरी पळत जाउन आई-बाबांना ते आनंदानं सांगण्याचं सुख कधी मिळालं नाही… पण आज सांगतो आई-बाबांना, बायको आणि माझ्या छोट्या मुलांनाही, “माझ्या बाईंनी मला बक्षीस दिलं."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : जान्हवी कपूरसोबत रेखानं असं काय केलं की लोकांना आली श्रीदेवीची आठवण? म्हणाले 'आई...'

संकर्षणची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यानंतर नेटकऱ्यांनी संकर्षणची शाळा घेण्यास सुरुवात केली. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, "व्वा कऱ्हाडे सुंदरच पण हे कॅप्शन बाईंनी वाचल्यावर रागावणार बघा किती ती ऱ्हस्व दीर्घ ची गडबड." दुसरा नेटकरी म्हणाला, "जपे बाईंनी ही पोस्ट वाचू नये याची काळजी घ्या. ऱ्हस्वदीर्घाच्या चिक्कार चुका आहेत." तिसरा नेटकरी म्हणाला, "बाई, आम्हांला संकर्षण खूप खूप आवडतो. सगळ्यांशी खूप छान संवाद साधतो. ऱ्हस्व दिर्घच्या चुका बोलण्यात कधीच करत नाही. सगळ्या चाहत्यांना हवाहवासा वाटतो.. हे सगळं त्याच्या सगळ्या शिक्षकांमुळेच आणि आईवडिलांच्या उत्तम संस्कारांमुळेच!"

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x