'वडील म्हणाले का करतोयस लग्न...?' वयाच्या चाळीशीत लग्न करताना संजय मोने यांनी सांगितला किस्सा

Sukanya Mone and Sanjay Mone: मराठीतही असे अनेक सेलिब्रेटी कपल आहेत ज्याची सोशल मीडियावर तूफान चर्चा रंगलेली असते. सध्या चर्चा आहे ती म्हणजे सुकन्या मोने आणि संजय मोने यांची. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीतून आपल्या वैयक्तिक आयुष्याचा खुलासा केला आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Nov 2, 2023, 07:57 PM IST
'वडील म्हणाले का करतोयस लग्न...?' वयाच्या चाळीशीत लग्न करताना संजय मोने यांनी सांगितला किस्सा title=
sanjay mone shares his memory of getting married at the age of 40 latest entertainment news in marathi

Sukanya Mone and Sanjay Mone: बॉलिवूडप्रमाणे मराठी सेलिब्रेटी कपल्सचीही जोरात चर्चा रंगलेली असते. सध्या मराठीतलं एक लोकप्रिय कपल आहे ते म्हणजे सुकन्या मोने आणि संजय मोने. सध्या त्यांची सोशल मीडियावर जोरात चर्चा रंगलेली आहे. त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीतून आपल्या वैयक्तिक आणि वैवाहिक जीवनावर खुलासा केला आहे. त्यांच्या लग्नाला अनेक वर्षे झाली असून ते दोघंही मनोरंजन क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांना जुलिया नावाची मुलगीही आहे सध्या ती ऑस्ट्रेलियामध्ये आपलं शिक्षण घेते आहे.

यावर्षी सुकन्या मोनेचा बाईपण भारी देवा हा चित्रपट चांगलाच गाजला होता. त्यामुळे सुकन्या मोने यांची जोरात चर्चा रंगलेली होती. संजय मोने आणि सुकन्या मोने यांनी एकत्र चित्रपटांतून, नाटकांतून कामं केली आहेत. त्यांचे 'कुसूम मनोहर लेले' हे नाटक प्रचंड गाजलं होते. 

यावेळी लोकमत फिल्मीला दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या नात्याविषयी खुलासा केला आहे. सुकन्या मोने यांच्या संजय मोने यांनी वयाच्या चाळीशीत लग्न केले होते. तेव्हा यामागील नक्की किस्सा काय होता हे त्यांनी यावेळी सांगितला आहे. ते म्हणाले की, 'मला वडिलांनी विचारलं होतं का करतोयस लग्न. सगळं व्यवस्थित चाललंय ना तुझं. यात आलं ना सगळंच. मग वाटलं की या वयात लग्न करायचं तर अशा मुलीशी करावं लागेल जिला माझ्या आईवडिलांमध्ये स्वत:चे आईवडिल दिसले पाहिजेत. बाकी आयुष्यात माझे बरेच अंदाज चुकले पण तो अंदाज मात्र अत्यंत योग्य ठरला. प्रामाणिकपणे सांगतो की माझ्या आईवडिलांची तिने जितकी सेवा केली तितकी मी केली नाही. तिनं शंभर टक्के सेवा केली. मी 70-75 टक्के केली. माझा हा अचूक निर्णय होता.' असं ते यावेळी म्हणाले. 

हेही वाचा : लग्नाला अनुपस्थित राहिलेल्या प्रियांका चोप्राला परिणिती-राघवला भेटायचा मुहूर्त मिळाला; फोटो व्हायरल

सुकन्या मोने आणि संजय मोने यांनी 1998 साली लग्न केले. त्यांच्यात 9 वर्षांचे अंतर आहे. संजय आणि सुकन्या मोने यांनी अनेक मराठी-हिंदी नाटक, मालिका, चित्रपटांतून कामं केली आहे. सध्या सोशल मीडियावरही ते दोघं सक्रिय आहेत. सुकन्या मोनेही आपले अनेक फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. ती सध्या काय करते या मराठी चित्रपटातूनही ते दोघं एकत्र दिसले होते. यावेळी त्या दोघांनी अभिनय बेर्डेच्या आईवडिलांची भुमिका केली होती.