सलमानने भाच्याला शिकवली खास पेंटिंग : व्हिडिओ

मामा - भाच्याचा व्हिडिओ व्हायरल 

सलमानने भाच्याला शिकवली खास पेंटिंग : व्हिडिओ  title=

मुंबई : सलमान खानचं बहिण अर्पिताच्या मुलाशी खूप चांगल बॉन्डिंग आहे. मोकळा वेळ मिळाल्यावर सलमान खान भाचा आहिलला भेटायला जातो. आणि त्याच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं पसंत करतो. यावेळी देखील सलमान खानने आहिलसोबत वेळ घालवला. आहिलला एक नवीन गोष्ट सलमानने शिकवली आहे. त्याचा हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

सलमानने आपला भाचा आहिलला कॅनव्हासवर पेंटिंग करायचं शिकवलं आहे. मात्र या शिकवणी दरम्यान जे झालं ते अगदी हसून हसून वेडं करणारं आहे. हा व्हिडिओ सध्या अनेक लोकं पाहून व्हायरल करत आहेत. अर्पिताने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये मामा - भाचे अगदी आनंद लुटताना दिसत आहे. या व्हिडिओची सुरूवात कॅनव्हासवर रंग पसरवलेले दिसत आहे. भाचा आहिल आणि मामा सलमान रंगकाम करताना दिसत आहे. या दोघांचे कपडे आणि हात दोन्ही रंगांनी माखले आहेत. 

या संपूर्ण व्हिडिओ सलमान खान आहिलला प्रोत्साहन देताना दिसत आहे. आहिल देखील आपल्या मामाचीसोबत एन्जॉय करत आहे. अखेर आहिल कॅनव्हासवर पडतो आणि त्याची पहिली पेटिंग पूर्ण होते. सलमान खानला स्वतःला पेंटिंगची आवड आहे. त्यांचे अनेक पेंटिंग्स विकले देखील आहे. तर काही पेंटिंग्स सलमानच्या बंगल्यातील भिंतीवर आहेत.