बॉलिवूडमध्ये खूप कमी कुटुंब आहेत जे लोकप्रिय आहेत. त्यातील एक कुटुंब आहे सलमान खानचं. खान कुटुंबात कुठल्याही सोहळा असला की, त्याचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. खान कुटुंबाचा असा एक सोहळ्याची व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सलमान खानची आई सलमा खान यांचा वाढदिवस मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात आला. या बर्थडे पार्टीचे व्हिडीओ आणि काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. (salman khan mother salma khan dance with salim khan second wife helen in birthday party video viral)
खरं तर या बर्थ डे पार्टीत सलमा आणि हेलनने सर्वांचं लक्ष वेधलं. हेलन या सलीम खान यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत. खान कुटुंबात कुठलाही सोहळा असो हेलन कायम उपस्थितीत असतात. सलमा यांच्या वाढदिवसाच्या आनंदातही त्या सहभागी झाल्या. एवढंच नाही तर या दोघींनी एका गाण्यावर डान्सही केला. हे पाहून मराठीतील एक चित्रपट आठवतो, सवत माझी लाडकी.
या बर्थडे पार्टीमधील एक व्हिडीओ सलमान खाननेही त्याचा सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात सोहेल खान आई सलमासोबत नाचताना दिसतोय. सलमानने हा व्हिडीओ शेअर करताना एक सुंदर मेसेज लिहिलाय. आईला 'हॅपी बर्थडे, मदर इंडिया, आमची दुनिया' असं लिहिलंय. सलमा यांचा हा 78 वा वाढदिवस होता.
सोहेल खानच्या पोस्टवर त्याची वहिनी शूरा खान हिने हार्ट इमोजी टाकून सासूवर प्रेमाचा वर्षाव केला. अरबाज खानने त्याच्या इंस्टाग्रामच्या स्टोरीज सेक्शनवर व्हिडिओ शेअर करताना 'माँ' असं लिहिलंय.
सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर तो लवकरच 'सिकंदर'मध्ये दिसणार आहे. सलमानसोबत 'सिकंदर' स्टार्स 'पुष्पाची 'श्रीवल्ली' रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत असणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन एआर मुरुगदास करत असून नाडियादवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटचे साजिद नाडियादवाला निर्मित हा चित्रपट 2025 साली ईद च्या शुभ मुहूर्तावरप्रदर्शित होणार आहे.