2900 कोटींचा मालक असलेला सलमान फाटलेले शूज कार्यक्रमात येतो तेव्हा...

Salman khan wears torn shoes : सलमान खाननं कार्यक्रमात कतरिनासोबत लावली हजेरी, मात्र चर्चा फक्त सलमानच्या फाटलेल्या बूटांची... 

दिक्षा पाटील | Updated: Nov 23, 2023, 05:22 PM IST
2900 कोटींचा मालक असलेला सलमान फाटलेले शूज कार्यक्रमात येतो तेव्हा... title=
(Photo Credit : Social Media)

Salman khan wears torn shoes : बॉलिवूडचा भाईजान सलमान खाननं गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या 'टायगर 3' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. सलमान खानच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 400 कोटींची कमाई केली आहे. एकीकडे सलमान खान त्याच्या हटके अंदाजानं प्रेक्षकांची मने जिंकताना दिसतो. तर दुसरीकडे त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरत आहे. त्याचं कारण म्हणजे 2900 कोटींच्या संपत्तीचा मालक असलेल्या सलमान खाननं फाटलेलं बूट घातले आहेत. 

सलमान खानचा हा फोटो फर्रे या चित्रपटाच्या स्क्रीनिंगशी संबंधीत आहे. यावेळी सलमान खान कतरिना कैफसोबत दिसला होता. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोत जेव्हा लोकांचं लक्ष हे सलमान खानच्या फाटलेल्या बुटांनी वेधलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोटींच्या संपत्तीचा मालक असूनही सलमान खाननं फाटके बूट का घातले? आणि त्याला असे बूट घालताना लाज वाटली नाही का? सलमान खानचा हा फोटो पाहून सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. खरंतर सलमान खाननं घातलेली बूट ही फक्त फाटलेली नाही तर त्यासोबतच जुनी देखील आहेत. ते खूप खराब झाल्याचे फोटोत दिसत आहे. 

सलमान खान फाटलेलं बूटं का वापरतो याविषयी अभिनेत्री पलक तिवारी आणि जस्सी गिलनं खुलासा केला होता. याविषयी सांगताना पलक म्हणाली की तो इतका मोठा स्टार आहे, त्याच्याकडे इतके पैसे आहेत. तरी सुद्धा त्याच्या बूटांना खड्डा पडलेला असायचा. तेव्हा जस्सी गिलनं पुढे सांगितलं की मला देखील हेच सांगायचे होते की ते नेहमीच चामड्याची बूट घालतात आणि ती कधी-कधी फाटलेले असायचे. तेच घालून ते कधी कधी शूट करायचे. जस्सी पुढे म्हणाला की सलमान खान स्वत: बोलायचे की त्यांना या बूटांमध्ये कम्फर्टेबल वाटतं. 

सलमानच्या या व्हायरल झालेल्या फोटोवर कमेंट करत नेटकरी सलमान खानची बाजू घेत  आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला की सलमान किती डाऊन टू अर्थ आहे. दुसरा नेटकरी म्हणाला की फोटो काढत असतानाच कशात अडकून फाटला असेल. तिसरा नेटकरी म्हणाला, ही फॅशन देखील असू शकते. 

हेही वाचा : VIDEO : चाहता फुलांचा गुच्छ घेऊन येताच सलमानच्या बॉडीगार्ड्सनं दिला धक्का!

सलमान खानच्या 'टायगर 3' विषयी बोलायचे झाले तर 10 दिवसात चित्रपटानं 243.95 कोटींची कमाई केली आहे. तर वर्ल्ड वाईड कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर चित्रपटानं 729 कोटींची कमाई केली होती.