Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच

Salman Khan सध्या त्याच्या 'दबंग टूरवर आहे. सध्या त्याचा हा कॉन्सर्ट कोलकाता मध्ये होणार आहे. त्याच्या कॉन्सर्टला जाण्यासाठी आतुर असणाऱ्या त्याच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी. त्याच्या कॉन्सर्टमध्ये जाण्यासाठी मोजावे लागू शकतात इतके पैसे... सलमानच्या कॉन्सर्टला जाण्याचा विचार करत असाल तर करा हे काम...

दिक्षा पाटील | Updated: May 13, 2023, 01:16 PM IST
Salman Khan च्या 'दबंग टूरच्या कॉन्सर्ट'ला जायचा करताय विचार? एकदा तिकिटांची किंमत वाचाच title=
(Photo Credit : Social Media)

Salman Khan : बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत राहतो. सध्या सलमान खान त्याच्या दबंग टूरमुळे चर्चेत आला आहे. दबंग टूर रिलोडेड एंटरटेनमेंट कॉन्सर्टच्या माध्यमातून सलमान खान आणि त्याची टीम प्रेक्षकांचे मनोरंजन करत असते. आता सलमानची ही टूर कोलकाता येथे पोहोचली असून काही दिवसांमध्ये त्याच्या चाहत्यांना या कार्यक्रमाचा भाग होता येणार आहे. जेव्हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येईल. आता तुम्हालाही सलमानच्या या टूर कॉनर्स्टमध्ये हजेरी लावायची असेल तर त्यासाठी हा कॉनर्स्ट कधी होणात त्याची तारिख काय आणि किती तिकीट दर आहे? हे जाणून घेणं तर खूप महत्त्वाचं आहे. 

सलमानच्या या दबंड टूरच्या कॉन्सर्टचे आयोजन बऱ्याचवेळा परदेशात करण्यात आले आहे. सलमानच्या या टूरचे आयोजन आता कोलकाता येथे होणार आहे. एका रिपोर्टनुसार, सलमान खानच्या या कॉन्सर्टच्या तिकिटांची किंमत ही 699 रुपयांपासून 40,000 रुपयांपर्यंत आहे. इथेच हे थांबत नाही तर जर तुम्हाला लाउंजमध्ये प्रवेश हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 लाख ते 3 लाख रुपये मोजावे लागू शकतात. सलमान खानच्या या कॉनर्स्टमध्ये अनेक सेलिब्रिटी सहभागी होतात. यंदाच्या वर्षी प्रभू देवा, अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, पूजा हेगडे, जॅकलीन फर्नांडिस, मेहूणा आयुष शर्मा, गायक गुरु रंधावा आणि मनीष पॉल असतील. हे सगळे सलमानसोबत परर्फॉर्म करताना दिसतील. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

रिपोर्टनुसार, या टूर दरम्यान, सलमान खान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना भेटणार आहे. खरंतर शो संपल्यानंतर सलमान ममता बॅनर्जी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेणार असल्याचे म्हटले जात आहे.

हेही वाचा : गरोदरपणाच्या आनंदात पडला खडा; दीपिकाच्या नणंदेचा गर्भपात 

सलमानच्या कामाविषयी बोलायचे झाले तर सलमान खानचा नुकताच किसी का भाई किसी की जान हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी हा पसंतीस उतरला नाही असे म्हटले. तर चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली नाही. तर लवकरच 'टायगर 3' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर किंग खान म्हणजेच शाहरुख खान हा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. या शिवाय 'किक 2' हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर पठाण या चित्रपटात सलमाननं पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.