"एक कर्मा नावाचं हॉटेल आहे म्हणे...; वानखेडेंवर कारवाई होताच शाहरुखचं 'ते' ट्विट व्हायरल

Sameer Wankhde CBI Raid : एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या घरावर सीबीआयने शुक्रवारी छापा घातला. यानंतर सीबीआने समीर वानखेडे यांच्याविरोधत गुन्हा दाखल केला. या कारवाईनंतर वानखेडे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत.

आकाश नेटके | Updated: May 13, 2023, 01:50 PM IST
"एक कर्मा नावाचं हॉटेल आहे म्हणे...; वानखेडेंवर कारवाई होताच शाहरुखचं 'ते' ट्विट व्हायरल title=

Sameer Wankhde CBI Raid : अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे ((Narcotics Control Bureau) माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhde) यांच्या घरावर सीबीआयने (CBI) शुक्रवारी छापा टाकला. एनसीबीने समीर वानखेडेंविरोधात बेहिशोबी मालमत्ता  जमवल्याची तक्रार केल्यानंतर सीबीआयने त्यांच्या घरावर छापा टाकला. या छाप्यानंतर सीबीआयने समीर वानखेडे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे समीर वानखेडे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सीबीआयने समीर वानखेडे यांच्याशी संबधीत मुंबई, दिल्ली, रांची, कानपूरसह 29 ठिकाणांवरील मालमत्तांवर धाडी टाकण्यात आल्या आहेत. 

कॉर्डिलिया क्रूझवर पडलेल्या छाप्यादरम्यान समीर वानखेडे हे नाव फार चर्चेत आले होते. समीर वानखेडे यांनीच बॉलिवुड अभिनेता शाहरुख खान याच्या मुलाला अटक केली होती. शाहरुखचा मुलगा आर्यन खान 2 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डिलिया क्रूझवर होता. या क्रूझवर ड्रग्ज पार्टी सुरु असल्याची माहिती समीर वानखेडे यांना मिळाली होती. वानखेडे यांनी आपल्या पथकासह क्रूझवर धाड टाकत आर्यन खान, अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा या सगळ्यांना अटक केली होती. त्यानंतर महिन्याभरानंतर आर्यन खान तुरुंगातून बाहेर आला होता.

आता समीर वानखेडे यांच्यावरील कारवाईनंतर शाहरुख खान याचे एक ट्विट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. पठाण चित्रपटाच्या यशावर बोलताना 20 फेब्रुवारी रोजी शाहरुखने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधताना हे ट्विट केले होते.

समीर वानखेडेंवर कायदेशीर कारवाई झाल्यानंतर शाहरुखचे जुने ट्विट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. वानखेडेंवरील कारवाईनंतर शाहरुख खानने हे ट्विट केल्याचे त्याच्या चाहत्यांना वाटत आहे. मात्र तसे नाहीये. शाहरुखने हे ट्विट तीन महिन्यांपूर्वीच केले आहे.

दरम्यान, ड्रग्ज प्रकरणात अटकेत असलेल्या आर्यन खानच्या सुटकेसाठी समीर वानखेडे यांनी  शाहरुख खान यांच्याकडे 25 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे. त्यामुळे आता समीर वानखेडे यांच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत. आर्यन खान प्रकरणानंतर एनसीबीकडून समीर वानखेडेची चौकशी सुरू होती. एनसीबीची दक्षता समिती माजी अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांच्या आर्यन खान ड्रग प्रकरणाची चौकशी करत होती. या समितीने वानखेडे यांच्या बेहिशेबी संपत्तीचा अहवाल तयार करून सीबीआयला सादर केला होता.

समीर वानखेडे हे 2008 च्या बॅचचे IRS अधिकारी आहेत. समीर वानखेडेंची पहिली पोस्टींग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर डेप्युटी कस्टम कमिशनर म्हणून झाली होती. यानंतर समीर वानखेडे यांना आंध्र प्रदेश आणि दिल्लीला पाठवण्यात आलं. त्यानंतर 2020 मध्ये समीर वानखेडे यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई विभागाचे संचालक म्हणून काम सुरु केले.