मुंबई : काळवीट शिकार प्रकरणी सलामान खानसह अन्य सात कलाकारांवर आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे. याप्रकरणी सलमान खान प्रमुख आरोपी आहे तर सलमान खान सह तब्बू, नीलम, सैफ अली खान आणि सोनाली बेंद्रे यांच्याबाबतही शिक्षा सुनावण्यात येणार आहे.
सलमान खानच्या चाहत्यांसोबतच बॉलिवूडलाही आज सलमान खानला काय शिक्षा होणार ? याकडे लक्ष लागून राहिले आहे.
सलमान खानची क्रेझ आबालवृद्धांमध्ये आहे. त्यामुळे आज सलमान खानला शिक्षा होण्यापूर्वीच ट्विटरवर #WeSupportSalmanKhan हा हॅशटॅग ट्रेन्ड होत आहे. तर काही जणांनी या प्रकरणावर गंमतीशीर प्रकारात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अनेकांनी सलमान खान या प्रकरणातून सुटावा याकरिता प्रार्थानाही केल्या आहेत.
ALLAH bless you @BeingSalmanKhan Sir
in shaa ALLAH everything is gonna be okay. Our prayers are with you.
Love you Sir till last breath #Salmankhan#WeSupportSalmankhan#BlackbuckPoachingCase
pic.twitter.com/LdgpwAA4oE— Dipu (@LuvDipu) April 5, 2018
#BlackBuckPoachingCase
I don't know why it is taking so much time
It was such a simple case"Car blackbuck Chala rha tha "
Since it's already dead ,n double jeopardy is not allowed Let's move on to a PIL for something else like
"why isn't Bhaijaan Getting married"?— Pratul Kapoor (@pratulcapur) April 5, 2018
Salman Khan started an NGO called "Being human" to defend 2002 Hit and Run case.
Similarly he can start an NGO called "Being Animal" to defend #BlackBuckPoachingCase #BlackBuckVerdict— Siju Moothedath (@SijuMoothedath) April 5, 2018
ऑक्टोबर १९९८ रोजी मध्यरात्री दोन काळवीटांची शिकार केली, असा सलमानवर आरोप ठेवण्यात आलाय. सलमानवरील हा सिद्ध झाल्यास त्याला सहा वर्षांच्या कैदेची शिक्षा होऊ शकते. सलमानवर वन्यजीव संरक्षण कायद्याच्या कलम ५१ खाली आरोप असून त्यासाठी कमाल ६ वर्षे कैदेच्या शिक्षेची तरतूद आहे.
कनिष्ठ न्यायालयात अंतिम युक्तिवाद २८ मार्चला संपल्यानंतर मुख्य न्यायदंडाधिकारी देव कुमार खत्री यांनी निकाल ५ एप्रिलपर्यंत राखून ठेवला होता. सलमान मुंबईहून चार्टर्ड विमानातून येथे आला. त्यापूर्वी तो 'रेस ३'च्या चित्रीकरणासाठी अबू धाबी येथे होता. सोनाली, सैफ, तब्बू व नीलम हेही मुंबईहून जोधपूरला पोहोचले आहेत.