'करण - अर्जून आयेंगे'... सलमान-शाहरूख लवकरच येणार एकत्र

या सिनेमात दिसणार दोघं 

Updated: Nov 6, 2020, 05:24 PM IST
'करण - अर्जून आयेंगे'... सलमान-शाहरूख लवकरच येणार एकत्र  title=

मुंबई : शाहरूख खान (Shahrukh Khan) त्याच्या आगामी सिनेमाची आतुरतेने वाट पाहत आहे. पण आता अशी बातमी हाती येतेय की, शाहरूखच्या सिनेमात सलमान खान (Salman Khan) जॉईन होणार आहे. खान चाहत्यांसाठी ही अत्यंत महत्वाची बातमी आहे. 

शाहरूखने आपल्या 'पठान' (Pathan) सिनेमाची अधिकृत घोषणा अद्याप केलेली नाही. मात्र या सिनेमा जॉन अब्राहम खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. तसेच दीपिका पदुकोण देखील या सिनेमात दिसेल. 

आता या सिनेमात बिग स्टार सलमान खान दिसणार आहे. यामुळे 'करण-अर्जुन' लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसतील असं चाहत्यांच म्हणणं आहे. या वृत्ताने दोघांच्याही चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा शाहरुखने केलेली नाही. तरीही या दोघांनी एकत्र यावे, अशी मागणी आता त्यांचे चाहते करू लागले आहेत. 

'करण-अर्जुन' या चित्रपटानंतर जरी हे दोघेही मोठ्या भूमिकांमध्ये एकत्र झळकले नसले, तरी मागच्या दशकांत त्यांनी एकमेकांच्या चित्रपटांत लहान-लहान भूमिका केल्या आहेत. सलमान खानने शाहरुख खानच्या 'कुछ कुछ होता है', 'ओम शांती ओम' या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता. तर, शाहरुख खानने सलमानच्या 'हर दिल जो प्यार करेगा' आणि 'ट्यूबलाईट' या चित्रपटांमध्ये कॅमिओ केला होता.