Amrita Rao ने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं नाव

आरजे अनमोलसोबत चार वर्षांपूर्वी केलं होतं लग्न 

Updated: Nov 6, 2020, 04:46 PM IST
Amrita Rao ने मुलाच्या पहिल्या फोटोसोबत शेअर केलं नाव  title=

मुंबई : अभिनेत्री अमृता रावने (Amita Rao) एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. आई झालेल्या अमृताने आपल्या मुलाचा फोटो शेअर करत त्याच नाव चाहत्यांना सांगितलं आहे. अमृताने RJ अनमोलसोबत (RJ Anmmol) चार वर्षांपूर्वी लग्न केलं आहे. 

अमृता रावने काय ठेवलं मुलाचं नाव? 

अभिनेश्री आणि तिचा नवरा आरजे अनमोल यांनी आपल्या मुलाचं नाव 'वीर' (Veer) असं ठेवलं आहे. अमृताने इंस्टावर नवऱ्याची पोस्ट शेअर करत आपल्या चाहत्यांना माहिती दिली आहे. फोटोत या कपलनने बाळाच्या हाताचा फोटो शेअर केला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by AMRITA RA (@amrita_rao_insta) on

बाळाच्या जन्माच्या पाच दिवसांनंतर अमृताने आपल्या बाळाचा फोटो शेअर करत चाहत्यांना त्याची झलक दाखवली आहे. सोबतच आपल्या बाळाचं नावही सांगितलं आहे. अमृता आणि अनमोलनं आपल्या बाळाचा पूर्ण फोटो दाखवला नाही. तर तिघांचेही हात दिसत आहेत. अमृता, अनमोलनं आपल्या हातात बाळाचा हात धरून हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला अमृतानं कॅप्शन दिलं आहे, "हॅलो वर्ल्ड. हा आमचा मुलगा वीर. तुम्हा सर्वांचे त्याला आशीर्वाद हवेत आहे"

अमृताने ईश्क, विश्क, मै हू ना, विवाह यांसारख्या चित्रपटात भूमिका साकारली आहे. 2019 मध्ये आलेल्या राजकीय 'ठाकरे' चित्रपटात तिला पाहण्यात आलं होतं. 2016 मध्ये अमृता आणि अनमोल यांनी लग्न केलं होतं.

अमृता रावने आपल्याकडची गोड बातमी खूप दिवस लपवून ठेवली होती. नऊ महिने झाल्यावर पहिल्यांदा अमृताने सोशल मीडियावर आपण गरोदर असल्याचं सांगितलं. तिच्या या पोस्टमुळे चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता.