...म्हणून सलमान-दीपिका एकत्र झळकले नाही

दीपिका माझ्यासोबत चित्रपटात काम करेल त्यावेळी त्या चित्रपटाचं कथानकही तितकंच प्रभावीही असेल.

Updated: Mar 28, 2019, 02:58 PM IST
...म्हणून सलमान-दीपिका एकत्र झळकले नाही title=

मुंबई : बॉलिवूड भाईजान, दबंग खान सलमानने आपल्या फिल्मी करियरमध्ये जवळपास सर्वच आघाडीच्या अभिनेत्रींसोबत काम केलं आहे. परंतु या सर्व अभिनेत्रींमध्ये दीपिका पदूकोण अशी अभिनेत्री आहे जिच्यासोबत सलमानला चंदेरी पडद्यावर पाहण्यात आलं नाही. अनेकदा सलमान आणि दीपिका एकत्र काम करणार असल्याच्या चर्चाही होत होत्या. प्रत्यक्षात मात्र सममान-दीपिकाने सिल्व्हर स्क्रिनवर एकत्रित काम केलं नाही. आता एका मुलाखतीत खुद्द सलमाननेच दीपिकासह एकत्र न येण्याबाबत खुलासा केला आहे.

'डीएनए'ने प्रसिद्द केलेल्या वृत्तानुसार, सलमान खानने दीपिकासोबत काम न करण्याबाबत सांगितलं आहे. 'खरंतर, मलासुद्धा याबाबत आश्चर्य वाटतंय की, कधी मी आणि दीपिका एकत्र काम करणार? आतापर्यंत कोणीही दीपिका आणि मला कास्ट करण्यासाठी पुढे आलं नसल्याचं' सलमानने म्हटलंय. यानंतर सलमानने पुढे हसत सांगितलं की, दीपिका मोठी, आघाडीची अभिनेत्री आहे. जेव्हा कधी दीपिका माझ्यासोबत चित्रपटात काम करेल त्यावेळी त्या चित्रपटाचं कथानकही तितकंच प्रभावीही असेल. सध्या आमच्या जोडीबाबत काहीही नसल्याचं' सलमानने म्हटलंय. 

सलमानने त्याच्या आगामी चित्रपटांविषयीही सांगितलं. 'भारत'मध्ये कतरिना माझ्यासोबत झळकणार आहे. 'टायगर'च्या तिसऱ्या भागातही कतरिना आणि मी एकत्र काम करणार आहे. 'दबंग ३'मध्ये सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिकेत आहे. 'किक २'मध्ये माझ्यासोबत जॅकलिनला कास्ट करण्यात आलं आहे. दीपिकासोबत जर कोणत्याही चित्रपटासाठी ऑफर मिळाली तर कदाचित...' असं म्हणत सध्या दीपिका आणि माझ्यासाठी कोणताही चित्रपट नसल्याचं सलमानने म्हटलंय. त्यामुळे आता सलमान आणि दीपिकाची जोडी चंदेरी पडद्यावर कधी एकत्र पाहायला मिळेल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.