मुंबई : अभिनेता सलमान खानच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी काळविट प्रकरणात मोठा दिलासा मिळाल्यानंतर अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने सलमानला पुन्हा समन्स बजावला आहे. जवळपास तीन वर्ष जुन्या सायकल वादाप्रकरणी सलमानला समन्स पाठवण्यात आला. आज या प्रकरणी सलमान आणि त्याच्या बॉडिगार्डला न्यायालयात हजर राहण्यासाठी सांगण्यात आलं आहे.
बॉलिवूड अभिनेता सलमान खानला अंधेरी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं समन्स बजावलंय.. पत्रकाराला धमकावल्याचा सलमान आणि त्याच्या बॉडीगार्डवर आरोप करण्यात आलाय..सलमान खानसोबत त्याचा बॉडीगार्ड नवाज इक्बाल शेख यांना आज न्यायालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलंय.
सलमान संबंधित हे संपूर्ण प्रकरण 3 वर्षे जुनं आहे. त्यावेळी पत्रकाराने सलमान खान मुंबईच्या रस्त्यावर सायकल चालवत असतानाचा व्हिडीओ बनवण्याचा प्रयत्न केला. सलमानच्या बॉडीगार्डची परवानगी घेत पत्रकाराने व्हिडीओ बनवण्यास सुरूवात केली.
पण तरी देखील सलमान आणि त्याच्या बॉडीगार्ड असभ्य वर्तन केल्याचा आरोप पत्रकाराने केला. एवढंच नाही तर पत्रकाराचा मोबाईल हिसकावून त्यांना शिवीगाळ देखील केली.
त्यानंतर पत्रकाराने यांनी अंधेरीतील डीएन नगर पोलिस ठाण्यात सलमान खानविरोधात तक्रार दाखल केली होती. ही घटना 24 एप्रिल 2019 ची असल्याचं सांगण्यात येत आहे.