मुंबई : सैफ अली खान आणि करीना कपूर हे बॉलिवूडमधील लोकप्रिय कपलपैकी एक आहे. नुकतेच दोघंही मुंबई एअरपोर्टवर स्पॉट झाले. त्यांच्यासोबत त्यांची मुलंही होती. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. यूजर्सने व्हिडिओमध्ये काहीतरी पाहिलं, ज्यामुळे त्यांनी करीना कपूरला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
व्हायरल व्हिडिओमध्ये करीना कपूर सैफ अली खान आणि तिची मुलं तैमूर-जेहच्या पुढे पुढे चालत आहे. यावर यूजर्सनी करीनाला आपल्या निशाण्यावर घेतलंय. एका यूजरने लिहिलं, 'काय घाई आहे मॅडम'. तर दुसर्या यूजरने लिहिलंय की, 'सैफ आणि करीनामध्ये भांडण झाल्यासारखं वाटतंय?' त्याचबरोबर एका युजरने लिहीलंय की, वेगळे वेगळे का चालत आहात, वेगळा होण्याचा निर्णय आहे का? त्याचवेळी एका युजरने कमेंट केली की, 'करिना कशाबद्दल एवढा एटिट्यूड दाखवतेय?' अशा प्रकारे यूजर्स करीनाला ट्रोल करत आहेत.
कपल सुट्टीवरून परतलं
सैफ अली खान आणि करीना कपूर आपल्या दोन मुलांसोबत पतौडी पॅलेसला गेले होते. सुट्टी संपवून संपूर्ण कुटुंब मुंबईत परतलं आहे. सैफ अली खान विमानतळावर स्पॉट झाला तेव्हा तो हलका निळा शर्ट आणि पांढरी पँट परिधान केलेला दिसला. त्याने हातात एक पुस्तक घेतलं. त्याचवेळी करीनाने केशरी रंगाचा ट्रॅकसूट परिधान केला होता. तैमूर अली खान राखाडी रंगाचा स्वेटशर्ट आणि काळी पँट घातलेला दिसत होता आणि धाकटा मुलगा जेहला नॅनीने कडेवर घेतलेलं दिसत आहे.