मुंबई : 'हे दिवसही जातील...' ही म्हण तर प्रत्येकाचं माहित असेल. प्रत्येकाच्या आयुष्यात वाईट काळ येतो. अशा वाईट प्रसंगी काही धैर्याने विचार करतात, तर काही मात्र हिंमत हारतात. बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी स्वतःच्या बळावर इंडस्ट्रीमध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. या यादीमधील एक नाव म्हणजे दिग्दर्शक रोहित शेट्टी. ऐकेकाळी फक्त 30 रूपयांवर काम करणारा हा दिग्दर्शक आज बॉलिवूडवर राज्य करतोय.
रोहित शेट्टीचे वडील एमबी शेट्टी चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारायचे. पण रोहित लहान असताना त्यांचं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर शेट्टी कुटुंबाला अर्थिक परिस्थितीचा सामना करावा लागला. त्यामुळे त्यांना राहतं घर देखील विकावं लागलं. आर्थिक तंगी असल्यामुळे रोहित शेट्टीच्या आईने काम करण्यास सुरूवात केली.
परिस्थितीमुळे रोहितला शिक्षण देखील पूर्ण करता आलं नाही. त्यानंतर रोहितने ठरवलं की दिग्दर्शकचं व्हायचं आणि रोहितचा दिग्दर्शकाचा प्रवास सुरू झाला. वयाच्या 17व्या वर्षी कुकू कोहलीने त्याला इंटर्न म्हणून कामावर ठेवलं. इंटर्नशीपच्या काळात त्याला फक्त प्रवासासाठी 30 रूपये मिळायचे. पण ते पैसे रोहित खर्च न करता मलाडपासून अंधेरीच्या नटराज स्टुडिओपर्यंत पायी प्रवास करायचा.
एवढंच नाही तर रोहितने एका मुलाखतीत जुन्या आठवणी ताज्या केल्या. आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळे रोहितने अभिनेत्री तब्बू साडी देखली प्रेस केली होती. शिवाय अभिनेत्री काजोलसाठी त्याने स्पॉटबॉयचं देखील काम केलं होतं. त्यानंतर रोहितने अजय देवगनसोबत 'जमीन' चित्रपचटात काम केलं.
पण तेव्हा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला. त्यानंतर कोणीचं रोहित शेट्टीसोबत काम करण्यात तयार होत नव्हता. पण अजय देवगनने रोहितची साथ सोडली नाही. 2006 साली दोघांनी मिळून 'गोलमाल' चित्रपट तयार केला आणि या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात घर केलं. त्यानंतर अजय आणि रोहितचे चित्रपटांनी 100 कोटी रूपयांपर्यंत मजल मारली आणि रोहितचे दिवस पलटले. अजय आणि रोहितने 'गोलमाल' चित्रपटाचे 4 सिझन, 'ऑल द बेस्ट', 'सिंघम', 'सिंघम रिटर्न्स' अशा अनेक चित्रपचटांमध्ये एकत्र काम केलं.