Rishi Kapoor Abuse Me: मराठी चित्रपटसृष्टीबरोबरच हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी दिवंगत अभिनेते ऋषी कपूर यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव एका मुलाखतीमध्ये शेअर केला आहे. नाना पाटेकर आणि ऋषी कपूर यांनी 1995 साली 'हम दो' या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. याचसंदर्भात अनुभव नानांनी 'द लल्लन टॉप'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितला आहे. ऋषी कपूर यांना फार पटकन राग यायचा. यासाठी ते चित्रपटसृष्टीमध्ये ओळखले जायचे आणि त्यांचे असे अनेक किस्से आजही आवर्जून सांगितले जातात. नाना पाटेकर यांनाही ऋषी कपूर यांच्या या रागाचा सामना करावा लागला.
नाना पाटेकर यांनी अनेकदा ऋषी कपूर हे सेटवर संतापायचे असं सांगितलं. कोणत्याही सीनसाठी एकाहून अधिक वेळा शूट करण्यास ऋषी कपूर यांचा नकार असायचा, असंही नाना म्हणाले. शफी इनामदार दिग्दर्शित 'हम दो' चित्रपटामध्ये नाना आणि ऋषी कपूर यांनी पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं. नाना पाटेकर यांनी या चित्रपटाच्या शुटींगदरम्यानचा एक किस्सा सांगितला जेव्हा एका सीनसाठी ऋषी कपूर यांना अनेकदा टेक देण्यास म्हणजेच वारंवार चित्रिकरण करण्यास सांगण्यात आलं. "तो फार शिव्या द्यायचा," असं नाना ऋषी कपूर यांच्याबद्दलचा किस्सा सांगताना म्हणाले.
"तो फार चिडचीड करायचा. तो एकच टेक द्ययचा. कोणत्याही सीनसाठी तो दुसरा टेक देत नसेल. वरुन तो म्हणाला, आम्ही उत्कटपणे अभिनय करणारे आहोत. तुमच्यासारखे थेअटरमधील अभिनेते आम्ही नाही. काय बकवास करतोस, चल," अस ऋषी कपूर म्हणायचा," अशी माहिती नाना पाटेकर यांनी मुलाखतीत दिली.
नक्की वाचा >> Video: 'ती फार माज दाखवते!' एअर होस्टेसकडून अभिनेत्रीची पोलखोल; खरा चेहरा आणला समोर
"आम्ही पाच टेक दिल्यानंतर हवा तसा सीन मिळाला. मात्र तोपर्यंत ऋषी कपूर वैतागले होते. ऋषी यांच्या चिडचीडीमुळे तणावपूर्ण वातावरण निर्माण होऊन शेवटचा टेक घेतला आणि तोच चित्रपटात वापरला होता," असं नाना म्हणाले. "मी एकदा त्याला आणखी एक टेक देण्यासंदर्भात विचारलं कारण पहिला टेक फारच वाईट आला होता. त्यावर त्याने, "इथे दिग्दर्शक कोण आहे? शफी की तू? याला हटवा यार इथून" असं उत्तर दिलं होतं. त्याने तरी दुसरा टेक दिला. मात्र तो सुद्धा वाईठ होता. मी त्याला जाऊन म्हणालो, "चिंटू हे बकवास आहे." ते ऐकताच तो मला शिव्या देऊ लागला. अत्यंत घाणेकरड्या शिवाय तो देत होता आणि त्यानंतर पाचव्या टेकपर्यंत तर त्याने, 'आता मी तुला मारेन' अशी भूमिका घेतली होती. मात्र तो शेवटचा टेक उत्तम होता. तोच शेवटचा प्रयत्न आम्ही शेवटी चित्रपटात वापरला. मी जेव्हा डबिंगसाठी आलो होतो तेव्हा मी त्याला म्हणालो की बघ तो शेवटचा टेक ठेवला आहे चित्रपटात. त्यावर त्याने, "हा ठीक आहे, यार!" असं उत्तर दिलेलं. तो आजारी असताना आम्ही फार गप्पा मारायचो," असं नाना पाटेकर ऋषी कपूर यांच्या आठवणी सांगताना म्हणाले.
नक्की वाचा >> कॅमेरा वळताच अजय देवगण.., सर्वात उद्धट सेलिब्रिटी कोण? त्याने मधलं बोट..; धक्कादायक खुलासे
नाना पाटेकर यांनी ऋषी कपूर यांना ल्युकेमियाचा त्रास असल्याचं निदान झाल्यानंतर ते उपचारासाठी न्यू यॉर्कला गेले होते. त्या काळातही फार गप्पा व्हायचा असं नाना म्हणाले. ऋषी यांना 2018 मध्ये ल्युकेमिया असल्याचं निदान झालं आणि 2020 मध्ये त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.