अभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत

Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन या वयातही आपल्या कामामुळे चर्चेत असतात. आता नुकतीच मुंबईत त्यांनी  प्रॉपर्टी विकत घेतली आहे. याची किंमत कोट्यवधी रुपयात आहे. 

राजीव कासले | Updated: Jun 26, 2024, 03:45 PM IST
अभिषेकनंतर आता अमिताभ बच्चन यांनी मुंबईत खरेदी केली इतकी प्रॉपर्टी, किंमत कोट्यवधीत title=

Amitabh Bachchan Buy Properties in Mumbai : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चनने (Amitabh Bachchan) काही दिवसांपूर्वी मुंबईत 6 अपार्टमेंट खरेदी केले होते, याची चांगलीच चर्चा झाली. आता बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांनी कोट्यवधीची प्रॉपर्टी (Property in Mumbai) विकत घेतली आहे. अमिताभ बच्चन सध्या आपला आगामी चित्रपट  'कल्कि 2898 एडी' मुळे चर्चेत आहेत. यादरम्यान अमिताभ बच्चन यांनी तब्बल तीन कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी केल्या आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या प्रॉपर्टीची किंमत कोट्यवधीत आहे. 20 जून 2024 ला या प्रॉपर्टीचं रजिस्ट्रेशन करण्यात आलं आहे. 

फ्लोरटॅम कॉमच्या प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन कागदपत्रांमुळे याचा खुलासा झाला आहे. अमिताभ बच्चन यांनी 60 कोटी रुपयात 8,429 स्केअर फुटाचे तीन फ्लॅट कार्यलायसाठी घेतले आहेत. हे तीनही फ्लॅट मुंबईतल्या अंधेरी पश्चिमेतल्या वीरा देसाई रोडवरच्या सिग्नेचर इमारतीत आहेत. यात तीन कार पार्किंगचाही समावेश आहे.

2023 मध्येही घेतली होती प्रॉपर्टी
अमिताभ बच्चन यांनी या तीन प्रॉपर्टीसाठी 3.57 कोटी रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचंही सांगण्यात येतंय. याआधी 2023 मध्ये अमिताभ बच्चन यांनी चार कार्यायलासाठी फ्लॅट खरेदी केले होते. याची किंमत जवळपास 29 कोटी रुपये इतकी होती.

अभिषेक बच्चनने खरेदी केले 6 फ्लॅट
अभिषेक बच्चनने नुकतेच मुंबईत 6 फ्लॅट खरेदी केले होते. Zapkey.com च्या रिपोर्टनुसार मुंबईतल्या बोरीवली परिसरातील ओबेरॉय रियल्टीच्या ओबेरॉय स्काय सिटी प्रोजेक्टमध्ये त्याने 6 फ्लॅट विकत घेतले. याची किंमत जवळपास 15.42 कोटी रुपये इतकी आहे. 

अमिताभ बच्चन यांचा आगामी चित्रपट
अमिताभ बच्चन लवकरच पॅन इंडिया सायन्स फिक्शन फिल्म 'कल्कि 2898 एडी' या चित्रपटात दिसणार आहेत. हा चित्रपट  27 जून, 2024 ला चित्रपटगृहात झळकणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहेत.   'कल्कि 2898 एडी' मध्ये अमिताभ बच्चन यांच्याशिवाय प्रभास, दीपिका पादुकोण, दिशा पटानी आणि कमल हासन दिसणार आहेत.