Reliance to Buy Alia Bhatt's ED a Mamma: आलिया भट्ट ही आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. त्यातून सध्या तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपटही लवकरच प्रदर्शित होणार आहे. रणवीर सिंगसोबत ती आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी व्यस्त आहे. अभिनयाबरोबरच ती आपला स्वत:चा ब्रॅण्डही चालवते. हा तिचा ब्रॅण्ड लहान मुलांच्या ड्रेसिंगसाठी तिनं आणला आहे. सोबतच तिच्या या ब्रॅण्डला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. ED a Mamma नावाचा हा तिचा ब्रॅण्ड आहे. आलिया आपल्या इन्टाग्राम अकांऊटवरून अनेकदा या ब्रॅण्डची जाहिरात करताना दिसते. परंतु सध्या आपला हा ब्रॅण्ड आलिया गमावण्याच्या परिस्थिती आहे का? समोर आलेल्या वृत्तानुसार, मुकेश अंबानी यांची 'रिलायन्स' ही कंपनी तिचा हा सर्वाधिक लोकप्रिय ब्रॅण्ड विकत घेणार आहे? असं कळते आहे.
एरवी टॅक्स वाचवण्यासाठी ब्रॅण्ड काढणारे हे सेलिब्रेटी अचानक आपलाच ब्रॅण्ड दुसऱ्याच्या खिशात का टाकू लागले आहेत? हा प्रश्न येथे येतो. आलियानं दोन वर्षांपुर्वी आपला हा ब्रॅण्ड लॉन्च केला होता. या ब्रॅण्डला ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद मिळू लागला होता. परंतु आता अचानक एकाकी असं काय झालं की आलियानं आपला हा ब्रॅण्ड अंबानींच्या हातात देण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे बिझनेसमध्ये आपल्याच हातातला घास दुसऱ्याला दिल्यासारखा आहे. आलियानं हा ब्रॅण्ड नक्की का विकायला काढला आहे आणि यामागे नक्की काय कारण आहे तसेच आर्थिक गुपित काय आहे हे या लेखातून समजून घेऊया.
'द इकोनॉमिक टाईन्स'नं दिलेल्या रिपोर्टनुसार, रिलायन्स ब्रॅण्डस आता आलियाची ED a Mamma ही कंपनी विकत घेऊन लहान मुलांच्या कपड्यांना म्हणजेच चिल्ड्रन वेअरला मार्केटमध्ये अधिक बळकट करण्याचे पाहता आहेत. आलियाची ही कंपनी त्यावरच आधारित आहे. सध्या लहान मुलांच्या कपड्यांचे मार्केटही वाढू लागले आहे. मोठ्या प्रमाणात मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय लोकं आपल्या लेकरांसाठी ब्रॅण्डेड कपडे विकत घेताना दिसत आहेत.
आलिया भट्टच्या एटर्नलिया क्रिएटिव्ह या कंपनीमार्फत ED a Mamma हा ब्रॅण्ड आहे. ही कंपनी विकत घेण्यासाठी 300-350 कोटी रूपयांची डील होऊ शकते. सोबत ही कंपनी विकत घेण्याची चर्चा ही अंतिम टप्प्यात आली आहे. सध्या या कंपनीची डील ही चर्चेत आली आहे.
हेही वाचा - जान्हवी कपूरबरोबर पहिलाच चित्रपट, पण एक महिना वरुण धवन तिच्याशी बोलला नाही. कारण...
ED a Mamma या कंपनीची मार्केट व्ह्यल्यू ही 150 रूपये इतकी आहे. सोबतच घरगुती ब्रॅण्डची तफावत यातून भरून काढण्याचा आलियाचा प्रयत्न होता. त्यातून हे कपडेही माफक दरामध्ये उपलब्ध आहेत. परंतु आता ही कंपनी विकत घेत रिलायन्स आपला व्यावसायिक विस्तार करणार आहे.