राझीचं हे गाणं व्हायरल; प्रत्येक मुलगी म्हणावंस वाटेल, 'लव्ह यू पापा'!

बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी सिनेमाचं गाणं दिलबरो व्हायरल झालं आहे.

Updated: Apr 27, 2018, 10:59 AM IST

मुंबई : बॉलीवूडची अभिनेत्री आलिया भट्टच्या राझी सिनेमाचं गाणं दिलबरो व्हायरल झालं आहे, यूट्यूबवर भारतात हे गाणं नंबर ७ वर ट्रेडिंग होत आहे. प्रसिद्ध गायिका हर्षदीप कौरने हे गाणं गायले आहे, तर या गाण्याचे शब्द कविवर्य गुलजार यांनी लिहिले आहेत. आपल्या मुलीला बिदाई देतानाचं हे गाणं आहे, गाणं अतिशय भावूक आहे. राझी एका काश्मिरी मुलीची कथा आहे. या मुलीला पाकिस्तानात भारताची गुप्तहेर म्हणून पाठवलं जातं. हे गाणं २४ तासानंतरही यूट्यूबवर ट्रेडिंग आहे. आलिया भट्टने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर हे गाणं पोस्ट करताना लिहिलं आहे, लव्ह यू पापा...!