" माझी राणी! आम्हाला..." Deepika Padukone सोबतच्या नात्यावर Ranveer Singh नं सोडलं मौन

दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं जोडपं आहे. रणवीर आणि दीपिका यांनी 2013 मध्ये रीलिज झालेल्या रामलीला चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. सहा वर्षे डेट केल्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.

Updated: Oct 4, 2022, 01:28 PM IST
" माझी राणी! आम्हाला..." Deepika Padukone सोबतच्या नात्यावर Ranveer Singh नं सोडलं मौन title=

Ranveer Singh Reaction On Deepika Padukone Photo On Social Media: दीपिका पदुकोन आणि रणवीर सिंह बॉलिवूडमधील चर्चेत असलेलं जोडपं आहे. रणवीर आणि दीपिका यांनी 2013 मध्ये रीलिज झालेल्या रामलीला चित्रपटात पहिल्यांदा एकत्र काम केलं होतं. सहा वर्षे डेट केल्यानंतर 2018 मध्ये दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. दोघांचे चाहते जोडप्याला 'दीपवीर' नावानं संबोधतात. असं असताना गेल्या काही दिवसात या दोघांमध्ये काहीतरी बिनसलं असल्याचा बातम्या समोर आल्या होत्या. यावर दीपिका आणि रणवीरनं आपल्या शैलीत उत्तर देत अफवा असल्याचं दाखवून दिलं आहे. तीन दिवसांपूर्वी दीपिकाने रणवीर सिंहच्या इन्स्टाग्रामवरील फोटोवर फ्लर्टी कमेंट करल 'edible' आणि लीप इमोजी टाकला होता. आता रणवीर सिंहने ट्विटरवर केलेल्या कमेंट्समुळे दुराव्याची अफवा असल्याचं स्पष्ट झालं आहे.

रणवीर सिंहने आता दीपिका पदुकोनच्या फोटोवर कमेंट्स केल्याने अफवांना पूर्णविराम मिळाला आहे. दीपिकाचा फोटो एका ज्वेलरी ब्रँडने शेअर केला आहे. या फोटोनवर रणवीर सिंहने कमेंट्स केली आहे. "माझी राणी! आम्हाला तुझा अभिमान आहे. "

काही दिवसांपूर्वी दीपिकाची तब्येत बिघडल्याने तिला मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात होते. तिची तब्येत बिघडल्याच्या बातम्यांदरम्यान, सोशल मीडियावर नात्यात दुरावा निर्माण झाल्याची अफवा पसरली होती.