Deepika सोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये Ranveer Singh आणि Anushka Sharma चा 'तो' व्हिडीओ आला समोर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

Updated: Oct 29, 2022, 11:38 AM IST
Deepika सोबतच्या घटस्फोटांच्या चर्चांमध्ये Ranveer Singh आणि  Anushka Sharma चा 'तो' व्हिडीओ आला समोर, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग (Ranveer Singh) हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे.रणवीर हा त्याच्या दमदार अभिनय आणि त्याच्या फॅशनसाठी ओळखला जातो. रणवीरनं थोड्याच काळात बॉलिवूडमध्ये स्वत: चं स्थान निर्माण केलं. रणवीरनं 'बँड बाजा बारात' (Band Baja Barat) या चित्रपटातून रणवीरनं बॉलिवूडमध्ये एन्ट्री केली. या चित्रपटात रणवीरसोबत अभिनेत्री अनुष्का शर्मानंही (Anushka Sharma) बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. रणवीर हा गेल्या काही दिवसांपासून दीपिकासोबतच्या (Ranveer Singh And Deepika Padukone Divorce) घटस्फोटामुळे चर्चेत होता. आता रणवीर आणि अनुष्काचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत रणवीर अनुष्काबद्दल अश्लील बोलताना दिसत आहे. 

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला रणवीर आणि अनुष्काचा हा व्हिडीओ 2011 चा आहे. यावेळी रणवीर आणि अनुष्का दोघांनीही दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. यावेळी रणवीरनं अनुष्कावर धक्कादायक कमेंट केली. ही कमेंट ऐकून अनुष्कालाही आश्चर्याचा धक्का बसला. (Ranveer Singh publicly made a lewd comment on Anushka Sharma s Body part watch the Viral video) 

व्हायरल झालेल्या या व्हिडीओत रणवीर अनुष्काला बोलतो, 'Hey, you want your a** pinched? I'm right here!' त्यानंतर आश्चर्य चकीत झालेली अनुष्का रागात रणवीरकडे पाहू लागली.  यानंतर अनुष्कानं करण जोहरकडे पाहिलं यावर करण काही बोलेल अशी तिची अपेक्षा असताना करण मात्र फक्त हसत होता. हे पाहता अनुष्का लगेच रणवीरला म्हणाली, 'तू माझ्याबद्दल असं काही बोलू शकत नाही.'

हा व्हिडिओ पाहून रणवीरचे चाहते त्याला प्रचंड ट्रोल करत आहेत. एक नेटकरी म्हणाला, 'तो अनुष्का विषयी कधीच सीरिअस नव्हता हे यातून दिसत आहे. दीपिकाविषयी तो असं कधीच बोलला नसता.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'तिनं करणकडे मदतीसाठी पाहिलं पण तो हसत होता.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'बॉलिवूडचे वाईट विचार. अशा अनेक कमेंट करत नेटकऱ्यांनी रणवीरला ट्रोल केलं आहे.'