'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं?

Ranveer Deepika Viral Video : करण जोहरचा लोकप्रिय सेलिब्रिटी चॅट शो ‘कॉफी विथ करण’च्या आठव्या पर्वाच्या पहिला भागात रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोणने हजेरी लावली होती. या एपिसोडनंतर दीपिकाला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. त्यानंतर आता रणवीरच्या या कृत्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Updated: Nov 4, 2023, 04:12 PM IST
'जो हुआ जाने दो', रणवीर सिंगने कान पकडून पत्नी दीपिकाला असं का म्हटलं? title=

Ranveer Deepika Viral Video : दिग्दर्शक करण जोहर याच्या कॉफी विथ करण (koffee with karan) कार्यक्रमाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या कार्यक्रमाच्या नव्या पर्वाच्या पहिल्याच एपिसोडमध्ये दीपिका ( Deepika Padukone) आणि रणवीरच्या (Ranveer Singh) जोडीने हजेरी लावली होती. यावेळी दीपिकाने दिलेल्या उत्तरांमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु झाल्या होत्या. या मुलाखतीमुळे दीपिकाला ट्रोल देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर आता हे दाम्पत्य एका कार्यक्रमात पाहायला मिळालं. यावेळी मात्र रणवीरने सिंगने कान पकडून जे झालं ते जाऊ दे असं दिपीकाला म्हटलं आहे. त्यामुळे आता रणवीरने असं का केलं याची चर्चा सुरु झालीय.

बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच शाहरुख खानच्या (Shahrukh Khan Birthday) वाढदिवसाच्या पार्टीत हा सगळा प्रकार घडलाय. शाहरुखच्या वाढदिवसाच्या निमित्ताने 'मन्नत'मध्ये सेलिब्रिटींसाठी एक पार्टी होती, ज्यामध्ये रणवीर सिंग, दीपिका पदुकोण, रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि इतर अनेक प्रसिद्ध स्टार्स जमले होते. त्यातील रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो कान पकडून 'चलो भी जो हुआ, वो जाने दो...' हे गाणे गात आहे.

रणवीर सिंगने शाहरुख खानच्या 58व्या वाढदिवसाला खूप धमाल केली. गायक मिका सिंगसोबत तो जवळपास डीजे झाला होता. 'जवान', 'पठाण', 'चेन्नई एक्सप्रेस'च्या गाण्यांवर रणवीरने खूप डान्स केला. यावेळी शाहरुख खानच्या 'कभी हां कभी ना' या चित्रपटातील 'आना मेरे प्यार को ना तुम झूठा समझो जाना, सनम तुझे पाने का ये था सारा बहाना...' हे गाणे सुरु होताच रणवीर टेबलावर चढला. या गाण्यातील 'चलो भी जो हुआ जाने दो, बहुत हो चुका जाने दो' या ओळीवर रणवीरने दीपिकाच्या समोर कान पकडले. त्यावेळी दीपिकाही डान्स करत होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, दीपिकाने करण जोहरच्या शोमध्ये 'कॅज्युअल रिलेशनशिप'बाबत वक्तव्य केले होते. यावेळी तिने सांगितले की ती इतरांना डेट करत होती, पण मानसिकदृष्ट्या रणवीरसोबत होती. तिचे हे वक्तव्य अनेकांना पटलं नाही आणि सोशल मीडियावर तिच्यावर जोरदार टीका झाली.