रणबीरला खटकू लागली आलिया? पाहा काय म्हणाला.... 

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा नवा सिनेमा 'गंगूबाई काठियावडी' नुकताच रिलीज झाला आहे.

Updated: Mar 9, 2022, 05:03 PM IST
रणबीरला खटकू लागली आलिया? पाहा काय म्हणाला....  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा नवा सिनेमा 'गंगूबाई काठियावडी' नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाच्या यशाने आलियाचं नाव जगभरात प्रसिद्ध झालं आहे.  या सिनेमासाठी आलियाने बऱ्याच मुलाखती दिल्या आहेत. आलियाने नुकत्याच एका मुलाखती दरम्यान आपल्या पर्सनल लाईफचे बरेच किस्से सांगितले आहेत. असाच एक किस्सा आलियाने रणबीरसोबतचा शेअर केला आहे. जेव्हा रणबीरला आलिया खटकू लागली होती.  हा किस्सा सांगताना अभिनेत्री म्हणाली की, रणबीर कपूर तिच्या डोळ्यांवर नेहमी कमेंट करतो.  

आलिया भट्ट अलीकडेच वडील महेश भट्ट यांच्यासोबत एका मुलाखतीत सामील झाली होती. मुलाखतीदरम्यान महेश भट्ट यांनी मुलगी आलियाला एलियन असल्याचं सांगितलं. चित्रपट निर्माते म्हणाले, ती एलियन सारखी दिसते. वडिलांचे हे शब्द ऐकून आलियाला धक्काच बसतो आणि ती म्हणते, रणबीरही तिला विचित्र व्यक्ती आणि एलियन म्हणतो. अभिनेत्रीने सांगितलं की, रणबीर तिला अनेकदा हे सांगतो पण तिच्या वडिलांनी असं पहिल्यांदाच सांगितलं आहे. 

आलिया भट्टने मुलाखतीदरम्यान असंही म्हटलं होतं की, जेव्हा रणबीर कपूर तिचा लहानपणीचा फोटो पाहतो तेव्हा तो म्हणतो, फक्त तुझ्या डोळ्यांकडे बघ, अरे देवा. तू किती वेगळी आहेस आणि तुझे डोळे किती वेगळे आहेत? यांवर आलिया पुढे म्हणते, मी याचा फारसा विचार करत नाही. मला ते गोंडस वाटतं. आलिया भट्टने तिच्या लव्ह लाईफबद्दल सांगितलं की, रणबीर कपूर तिच्यामध्ये अशा गोष्टी बघतो ज्या तिच्या वडिलांनाही दिसतात. आता या संपूर्ण किस्सावरुन रणबीरला खटकणारी ही गोष्ट पुर्णपणे वेगळ्या अर्थी लागू होते. यावरुन स्पष्ट होतं की, रणबीरचं आलियावर जिवापाड प्रेम आहे.

आलिया भट्टच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, अभिनेत्रीचे बॅक टू बॅक बिग बजेट चित्रपट 2022 मध्ये रिलीज होणार आहेत. गंगूबाई काठियावाडीनंतर आलिया चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ही अभिनेत्री रणबीर कपूरसोबत ब्रह्मास्त्र चित्रपटात धमाकेदार परफॉर्मन्स देताना दिसणार आहे. बॉलिवूडमध्ये धुमाकूळ घातल्यानंतर आलिया भट्ट आता हॉलिवूडचाही भाग बनणार आहे. अभिनेत्री लवकरच हॉलिवूड स्पाय थ्रिलर हार्ट ऑफ स्टोनमध्ये देखील दिसणार आहे.