'या' फोटोतील सुप्रसिद्ध स्टारचं नाव ओळखण्याआधी सांगा, ही मुलगी आहे कि मुलगा?

या मुलाच्या निरागसतेवर अनेकजण फिदा झाले आहेत.

Updated: Mar 9, 2022, 04:38 PM IST
  'या' फोटोतील सुप्रसिद्ध स्टारचं नाव ओळखण्याआधी सांगा, ही मुलगी आहे कि मुलगा? title=

मुंबई : बॉलिवूड स्टार्सची लाईफस्टाईल चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून फॉलो करताना दिसतात. सध्या अनेक बॉलीवूड स्टार्सचे बालपणीचे फोटो व्हायरल आहेत. ज्यांना या फोटोवरुन ओळखणं ही अनेकांना कठीण झालं आहे.

चाहते त्यांच्या आवडत्या स्टार्सचे बालपणीचे फोटो सतत शेअर करत असतात. ते त्यांच्या आवडत्या स्टार्सच्या आयुष्याबाबतही जाणून घेण्यात उत्सुक असतात. अलीकडेच, पोनीटेल बांधून बॅडमिंटन हात असलेल्या एका स्टारचा बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

फोटोमध्ये दिसणारा हा मुलगा कि मुलगी असा ही प्रश्न अनेकांना पडला आहे. हा फोटो एका लहान मुलाचा आहे. जो आज बॉलिवूडचा लोकप्रिय अॅक्शन स्टार म्हणून ओळखला जातो.

या मुलाच्या निरागसतेवर अनेकजण फिदा झाले आहेत. हा स्टार आता एका वर्षात चार ते पाच चित्रपट प्रदर्शित करणारा तो एकमेव बॉलिवूड अभिनेता ठरला आहे.

जेव्हा सगळे गाढ झोपेत असतात, तेव्हा त्याचा दिवस सुरु होतो. फोटोमध्ये दिसणारा हा गोंडस लहान मूलगा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आहे.

होय, लहानपणीच्या फोटोत अक्षय खूपच वेगळा दिसत आहे. ज्यामुळे लोकांना ओळखणं ही कठीण झालं आहे. हा फोटो अक्षय कुमारचा असल्याचे समजताच या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरू केला आहे.तसेच हा फोटो मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येत आहे.