Ranbir-Katrina ला अशा अवस्थेत पाहून आलिया आणि विकी काय म्हणतील?

कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला... लग्नानंतरही रणबीरचा जीव अडकलाय  कतरिनामध्ये  

Updated: Oct 6, 2022, 09:25 AM IST
Ranbir-Katrina ला अशा अवस्थेत पाहून आलिया आणि विकी काय म्हणतील? title=

मुंबई : बॉलिवूडमध्ये अनेक सेलिब्रिटींची नावं एकमेकांसोबत जुळली, त्यांच्या प्रेमप्रकरणाची सर्वत्र चर्चा झाली, पण जेव्हा चाहत्यांनी डोक्यावर घेतलेल्या जोडप्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला, तेव्हा चाहत्यांना मोठा धक्का लागला. अशाच जोडप्यांपैकी एक म्हणजे अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif). रणबीर-कतरिनाच्या (ranbir-katrina) नात्याची चर्चा तुफान रंगली, पण हे नात लग्नापर्यंत पोहोचू शकलं नाही. आता देघांचे मार्ग वेगळे झाले असले तरी, रणबीरचा जीव अद्यापही कतरिनामध्ये अडकल्याचं दिसून येत आहे. 

सध्या दोघांना एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. खास नवरात्रीच्या सेलिब्रेशनसाठी कतरिना कैफ आणि रणबीर कपूर पोहोचले. जिथे फिल्म इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. (Ranbir Kapoor and Katrina Kaif spot together in navratri)

सेलिब्रिटींनी सजलेली ही खास नवरात्री पूजा (navratri puja) केरळमध्ये आयोजित करण्यात आली होती. जिथे कतरिना आणि रणबीर देखील सामील झाले. या सेलिब्रेशनमधून दोघांचे अनेक फोटो समोर आले आहेत. 

व्हायरल होत असलेल्या एका फोटोमध्ये कतरिना पूजा केल्यानंतर आरती करताना दिसत आहे, तर गर्दीत उभा असलेला रणबीर तिच्याकडे टक लावून पाहत आहे. त्यामुळे रणबीरचा जीव लग्नानंतरही कतरिनामध्ये अडकला असल्याचं चाहते म्हणत आहेत. दोघांचा फोटो पाहिल्यानंतर विकी आणि कतरिना यांची काय प्रतिक्रिया असेल, याचा अंदाजही लावता येणार नाही. (Ranbir Kapoor ex girlfriend)

दरम्यान, रणबीर आणि कतरिनाच्या ब्रेकअपनंतर अभिनेत्रीने अभिनेता विकी कौशलसोबत (Vicky Kaushal) लग्न केलं, तर रणबीरने अभिनेत्री आलिया भट्टसोबत (Alia Bhatt) लग्न केलं. लग्नाच्या दोन महिन्यांनंतर आलिया आणि रणबीरने चाहत्यांसोबत गोड बातमी शेअर केली. नुकताच आलियाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम देखील पार पडला.