'कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो', 'आदिपुरुष' सिनेमातील 'हनुमान' वादाच्या भोवऱ्यात

आदिपुरुष' सिनेमातील 'रावण' नंतर 'हनुमान' निशाण्यावर   

Updated: Oct 6, 2022, 08:05 AM IST
'कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो', 'आदिपुरुष' सिनेमातील 'हनुमान' वादाच्या भोवऱ्यात title=

Boycott Adipurush: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास (Prabhas) स्टारर 'आदिपुरुष' (Adipurush) सिनेमा तुफान चर्चेत आहे. सिनेमात प्रभास प्रभू राम (Prabhu Manus) यांची भूमिका साकारताना दिसत आहे. नुकताच सिनेमाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. अनेकांनी 'आदिपुरुष' सिनेमाचा टीझर पाहुन नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहे. सिनेमातील कास्ट, रावणाच्या लूकनंतर आता 'हनुमान' (Hanuman) ही भुमिका वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. 

नेटिझन्सनी सिनेमाला VFX कार्टून म्हटलं आहे. हिंदू पौराणिक कथेवर आधारित आदिपुरुषाच्या रावणाची (Rawan) तुलना मुघल सम्राट खिलजीशी केली जात आहे. यासोबतच आता हनुमानलाही या ट्रोलिंगमध्ये ओढले असून, या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. (adipurush teaser)

'आदिपुरुष' सिनेमात  हनुमानाच्या भूमिकेत अभिनेता देवदत्त नागे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सिनेमाच्या टीझरमध्ये त्याच्या शरीरावर चामड्याचा पट्टा दाखवण्यात आला होता, ज्यामुळे अभिनेता सोशल मीडियावर चर्चेत आहे. आता त्याच्या दाढीवरूनही वाद  सुरू झाला आहे.  (adipurush controversy)

अनेक सोशल मीडिया युजरने आदिपुरुष सिनेमातील हनुमानावर टीका केली की, "कोणता हिंदू मिशीशिवाय दाढी ठेवतो..." अशी टीका करत हनुमानाच्या भूमिकेत असण्याऱ्या देवदत्त नागे (Devdatta Nage) ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. 

चर्चेत आहे 'आदिपुरुष'
'आदिपुरुष' जाहीर झाल्यापासूनच चर्चेत आहे. सिनेमात रामाच्या भूमिकेत प्रभास, सीतेच्या (Sita) भूमिकेत क्रिती सेनन आणि लंकेश रावणाच्या भूमिकेत सैफ अली खान (Saif ali Khan) आहे. सिनेमा 12 जानेवारी 2023 रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. पण सध्या सिनेमाची होणारी टीका पाहाता 'आदिपुरुष' सिनेमाला बायकॉट करण्याची मागणी जोर धरत आहे.