राखी सावंतनं Kiss मागताचं बॉयफ्रेंड आदिलनं असं काय केलं? पाहून बसेल धक्का

राखी सावंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर ठरतोय चर्चेचा विषय...

Updated: Jul 23, 2022, 04:03 PM IST
राखी सावंतनं Kiss मागताचं बॉयफ्रेंड आदिलनं असं काय केलं? पाहून बसेल धक्का title=

मुंबई : बॉलिवूडची ड्रामा क्विन अभिनेत्री राखी सावंत ही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सोशलम मीडियावर चर्चेचा विषय ठरते. सोशल मीडियावर राखीचे अनेक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. आता पुन्हा एकदा राखीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये बॉयफ्रेंडशी रस्त्यावर मस्ती करणं राखीला महागात पडलं आहे.  

राखीला तिच्या बॉयफ्रेंडसोबत पापाराझींनी स्पॉट केलं होतं. यादरम्यान राखी मस्तीच्या मूडमध्ये दिसली आणि ती रस्त्यावर अचानक तिच्या बॉयफ्रेंडकडून किस्सची मागणी करू लागली. आदिलही तिची मजा घेत होता. गंमत म्हणून आदिलनं त्याचा पाय वाकवून राखीच्या पाठीवर गुडघ्याने मारलं. राखीच्या चेहऱ्यावर असलेल्या हावभावावरून हे स्पष्ट होतं की तिला खूप जोरात लागलं आहे. तर आदिलसोबत मस्ती करणं राखीला महागात पडलं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

राखी आणि आदिलच्या मस्तीचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. आदिल आणि राखीची जोडी त्यांच्या चाहत्यांना खूप आवडते. या दोघांचे चाहते राखी आणि आदिलच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. अनेकदा राखी तिच्या आणि आदिलच्या लग्नाविषयी बोलतानाही दिसते, मात्र आतापर्यंत राखीने तिचं आणि आदिलचं लग्न कधी होणार याची पुष्टी केलेली नाही.

दरम्यान, या आधी राखीनं रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटवर तिची प्रतिक्रिया दिली होती. या व्हिडिओत, जेव्हा पापाराझी राखीला विचारतात की रणवीर सिंगचा न्यूड फोटो व्हायरल होत आहेत. तर तुझी प्रतिक्रिया काय आहे असा प्रश्न तिला विचारला. तेव्हा राखी म्हणाली, "तुम्हाला नग्न वाटतं, तुमचे डोळे नग्न आहेत. मला कुठूनही तो नग्न होताना दिसत नाही. माझ्या रणवीर मित्राबद्दल कोणी काहीही बोलणार नाही. आदिलही काही बोलू शकत नाही. 

पुढे व्हिडिओमध्ये राखी रणवीरने हे फोटोशूट का केले हे देखील सांगत आहे. राखी म्हणाली, "यामागे काय कारण आहे, रणवीर सांगू शकत नाही पण रणवीरची मैत्रिण सांगेल. लंडन, अमेरिका आणि दुबईमध्ये खूप गरम होत आहे. फक्त तिथेच नाही तर इथेही खूप गरम होतं आहे. तर माणूस काय करेल, एसी सुद्धा चालत नाही. रणवीर फक्त कपडे काढून आंघोळीला गेला, तेव्हा दोन माकडं त्याचे कपडे घेऊन पळाले. राखी सावंतचा हा फनी व्हिडिओ चाहत्यांना खूप आवडला असून लोक त्यावर खूप मजेशीर कमेंट करत आहेत.